चेह-यामागचा ‘चेहरा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:05 IST2016-05-12T13:35:02+5:302016-05-12T19:05:02+5:30

अनेक कलाकार आपल्या कलेनं चित्रपटसृष्टी गाजवतायत. अशाच अनेक कलाकारांपैकी एक अवलिया म्हणजे मेकअपमन सुभाष शिंदे. गेल्या दोन दशकांपासून दिग्गज ...

Face-to-face 'face' | चेह-यामागचा ‘चेहरा’

चेह-यामागचा ‘चेहरा’

ेक कलाकार आपल्या कलेनं चित्रपटसृष्टी गाजवतायत. अशाच अनेक कलाकारांपैकी एक अवलिया म्हणजे मेकअपमन सुभाष शिंदे. गेल्या दोन दशकांपासून दिग्गज कलाकारांना रुपेरी पडद्यावर वेगळं रुप देण्याची किमया त्यांनी साधलीय. याच चेह-यामागील चेह-याविषयी जाणून घेणारा खास संवाद.

ब्रश आणि कलरशी नातं कसं जुडलं ?

लहानपणापासूनच मला चित्रकला, व्यंगचित्रं याची विशेष आवड होती. रंग, ब्रश याच्याशी नातं जडलं होतं. त्यामुळ तेव्हापासूनच ब्रशवर खास पकड निर्माण झाली.. त्यातच कलाकारांना कला सादर करण्यासाठी तयार करणं ही एक नवी कला आहे असं मला उमगलं आणि ते करण्यात मला आनंद मिळू लागला.. मेकअपमनची कला शिकण्यासाठी कोणत्याही शाळेत किंवा संस्थेत गेलो नाही.


मेकअपमन म्हणून या चित्रपटसृष्टीत एंट्री कशी झाली ?

चित्रपटसृष्टीत सहजासहजी काम मिळालं नाही. ब्लॅक, शिरीन फरहाद की निकल पडी, पतियाला हाऊस सिनेमासाठी काम केलं.. मेकअपमन म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतही प्रयत्न केले पण संधी मिळाली नाही. अखेर राजीव पाटील यांनी 72 मैल एक प्रवास या सिनेमात काम दिलं.. त्यानंतर संजय जाधव यांच्या प्रत्येक सिनेमात काम केलं..  


मेकअपमनचं काम चेहरा रंगवणं असा अनेकांचा गैरसमज आहे. याबद्दल काय सांगाल ?

मेकअपमनचं मुख्य काम म्हणजे कलाकारांचा चेहरा रंगवणं इतकंच नाही. तर त्या व्यक्तीरेखेला रुपेरी पडद्यावर जिवंत करणं. प्रत्येक सिनेमात कलाकाराचा लूक हा महत्त्वाचा असतो. त्या लूकला न्याय देणं हे कलाकाराचं पहिलं काम असतं.. कलाकारांना फक्त सुंदर नटवणं इतकंच मेकअपमनचं काम नसंत तर त्या सिनेमातील व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर जिवंत करणं हे काम असतं.  

Aish

एखादी व्यक्तीरेखा त्या दिग्दर्शकाची कल्पना असते.. ती प्रत्यक्षात उतरवताना कोणती आव्हानं असतात ?

सिनेमाची कथा लिहीताना त्या पात्राची कल्पना केलेली असते. लेखक आणि दिग्दर्शक यांच्या डोक्यात त्या व्यक्तीरेखेविषयी पक्कं ठरलेलं असतं. त्या व्यक्तीरेखेचा लूक कलाकाराची निवड होण्याआधी ठरलेला असतो. दिग्दर्शकानं एकदा व्यक्तीरेखा ठरवली की ती स्क्रीनवर जिवंत करण्याचं मेकअपमनचं काम सुरु होतं. त्यासाठी बरीच तयारी रिसर्चसुद्धा करावं लागतं.


मेकअप करताना त्या कलाकाराचा विश्वास किती महत्त्वाचा असतो ?

मेकअप करण्याआधी कलाकाराचा विश्वास संपादन करणं गरजेचं असतं. त्यामुळं एखादी व्यक्तीरेखा मला सांगितल्यानंतर मी त्या कलाकाराला जाऊन भेटतो जो ती व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे मेकअपच्या वस्तू, हेअर प्रॉडक्ट यांची माहिती घेतो. त्यानंतर त्या कलाकाराची त्वचा कशी आहे याचीही माहिती घेतो. कारण मेकअप जवळपास दहा ते बारा तास चेह-यावर राहतो. त्यामुळं त्वचा कशी आहे, ती तेलकट की ड्राय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. त्या प्रक्रियेमुळं 90 टक्के कलाकारांचा माझ्या कामावर विश्वास असतो आणि मला ते पूर्ण स्वातंत्र्य देतात. त्यांना काही वाटलं ते बदल सुचवतातही...   


गेली काही वर्षांपासून तुम्ही या चित्रपटसृष्टीत काम करताय.. तुम्ही केलेल्या विविध प्रयोगबद्दल जाणून घ्यायला आवडेल ?

पूर्वीच्या काळात चेह-यावर जाड मेकअप लावला जायचा जो ठळकपणे चेह-यावर दिसून येत असे.. मात्र आताच्या काळात तुम्हाला कळणारसुद्धा नाही की कलाकारानं मेकअप केला आहे किंवा नाही.. इतके सहज आणि सोप्या पद्धतीने सध्या मेकअप केला जातो.. मी मेकअपमध्ये विविध प्रयोग केलेत.. प्रोस्थेटिक तंत्र वापरुन मेकअप करण्याचा चित्रपटसृष्टीतला कधीही न झालेला यशस्वी प्रयोग करुन दाखवला.. मेरी कॉम सिनेमातील प्रियंका चोप्राच्या लूकसाठी हा प्रयत्न केला आणि रसिकांना तो चांगलाच भावला.

subhash

एखादा खास प्रयोग जो तुम्ही केला.. जो आमच्यासह शेअर कराल ?

गोलियों की रासलीला- रामलीला सिनेमामध्ये दीपिका पादुकोणच्या मेकअपसाठी वेगळा प्रयोग केला. यांत दीपिकाचा चेहरा धुळकट आणि काहीसा पिंगट दाखवायचा होता.. त्यासाठी तैलरंगाचा आधार घेऊन धूळकट चेहरा दाखवला.. याशिवाय दीपिकाच्या व्यक्तीरेखेसाठी गुजराती टॅटूही भन्साली यांना हवा होता.. त्यासाठी ब-याच महिन्यांच्या रिसर्चनंतर त्यात यश आलं.. सरबजीत सिनेमातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकसाठीही बरीच मेहनत घ्यावी लागली.    

यापुढे तुम्ही बॉलीवुड दिवा श्रीदेवी यांच्यासह काम करताय.. त्याबद्दल काय सांगाल.. ?

श्रीदेवी यांच्यासह काम करणं हे कोणत्याही कलाकारांसाठी ही भाग्याची गोष्ट असते. त्यांच्यासह मॉम या सिनेमात काम करण्याची संधी मिळतेय.. मॉम या सिनेमात या बॉलीवुड दिवाचा मेकअप करायला मिळणं यासाठी एक्साईटेड आहे. या सिनेमाच्या इतर गोष्टीबाबत आताच फार काही शेअर करु शकत नाही जस्ट वेट एंड वॉच.

श्रीदेवी यांच्यासह याआधीही काम केलंय. त्याचा किती अनुभव होईल असं वाटतं ?

श्रीदेवी यांच्यासह याआधीही जाहिराती आणि प्रमोशनसाठी काम केलं आहे. या अनुभवाचा चांगलाच फायदा होईल. सो ग्रेट एक्साईटमेंट इतकंच सांगू शकतो..

Web Title: Face-to-face 'face'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.