/>अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यसभेमध्ये जीएसटी (वस्तू व सेवाकर ) बिल मंजूर झाले आहे. यावर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आनंद व्यक्त क रुन, देशाचा विकास हा यामुळे वेगाने होईल असे म्हटले आहे. जीएसटी मंजूर झाल्याने महागाई वाढणार नसल्याचेही बोलले जात आहे. हे बिल लागू झाल्याने केंद्र व राज्यांमधील जवळपास दीड डझन अप्रत्यक्ष कर समाप्त होतील. शाहरुखलाही सुद्धा हीच अपेक्षा आहे. आर्थिक बाबीतील मला जास्त काही समजत नाही. परंतु, जेवढे मला समजले ते मी सांगतो. कारण की, जीएसटी हे विकासदर वाढविण्यासाठी खूप महत््वाचे आहे. याकरिता मी सर्वांना धन्यवाद देतो, असेही त्याने ट्विटवर म्हटले आहे. मागील काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, शाहरुखला आयकर विभागाने नोटीस पाठविली असून,ती आयकर १३१ नुसार आहे. यामध्ये आयकर अधिकाºयांना तपास करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. शाहरुखची दुबई व ब्रिटनमध्येही संपत्ती आहे. त्याचबरोबर शाहरुख सोबत दीपिका पुन्हा दिसणार असल्याची चर्चा आहे.दीपिकाने आपली बॉलिवूड एन्ट्री सुद्धा शाहरुखच्या ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाने केली आहे. त्यानंतर ती शाहरुख सोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ व ‘हैप्पी न्यू ईअर’मध्ये दिसली होती.