​प्रदर्शनापूर्वीच ‘कबाली’ची २०० कोटी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 14:18 IST2016-06-12T08:46:01+5:302016-06-12T14:18:21+5:30

रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘कबाली’ प्रदर्शनापूर्वीच सॅटेलाईट आणि डिस्ट्रयुब्युशन राईट्स विकून २०० कोटी कमाई करुन यशस्वी झाला आहे. कबाली सिनेमाच्या निर्मितीसाठी १६० कोटींचा खर्च आला आहे.

Before the exhibition 'Kabbali' earns 200 crores | ​प्रदर्शनापूर्वीच ‘कबाली’ची २०० कोटी कमाई

​प्रदर्शनापूर्वीच ‘कबाली’ची २०० कोटी कमाई

नीकांतचा आगामी चित्रपट ‘कबाली’ प्रदर्शनापूर्वीच सॅटेलाईट आणि डिस्ट्रयुब्युशन राईट्स विकून २०० कोटी कमाई करुन यशस्वी झाला आहे.  कबाली सिनेमाच्या निर्मितीसाठी १६० कोटींचा खर्च आला आहे.

विशेष म्हणजे ‘कबाली’ चित्रपट अमेरिकेमध्ये ५००  स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार असून भारतासह जगभरातील ५ हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे.  मलेशिया, चीन आणि थायलंड देशांत्या भाषेतही सिनेमा डब करण्यात आला असून, १ जुलै रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. 
कबाली सिनेमाचे निमार्ते कलाईपुली थानू यांच्या माहितीनुसार, कबाली सिनेमासाठी ५०० स्क्रीन अमेरिकेत बुक केल्या असून, या सिनेमाचं प्रमोशनही मोठ्या ताकदीने केलं जाणार आहे.

कबाली सिनेमाचा पहिला टीझर 1 मे रोजी लॉन्च केला गेला. यू ट्यूबवर या टीझरला आतापर्यंत २ कोटींहून अधिक व्ह्यूज असून, ६७ सेकंदाचा हा टीझर रजनीकांतच्या हटके स्टाईलमध्ये दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं म्युझिकही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.

या सिनेमात रजनीकांत डॉन कबालीश्वरनच्या भूमिकेत असून, मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही मुख्य भूमिकेत आहे. तैवानचा सुपरस्टार विनस्टॉन चाओ याने सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे.

Web Title: Before the exhibition 'Kabbali' earns 200 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.