प्रदर्शनापूर्वीच ‘कबाली’देखील लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 13:23 IST2016-07-19T07:53:32+5:302016-07-19T13:23:55+5:30
आॅनलाईन चित्रपट लीक होण्याचे ग्रहण बॉलिवूड चित्रपटांना सध्या लागले असून या ग्रहणातून रजनीकांतचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कबाली’ देखील ...

प्रदर्शनापूर्वीच ‘कबाली’देखील लीक
‘कबाली’ येत्या २२ जुलैला प्रदर्शित होत आहे. मात्र त्यापुर्वीच हा चित्रपट आॅनलाईन वेगवेगळ्या वेबसाईट्सवर उपलब्ध असल्याची चर्चा आहे. याबाबती कबालीच्या टीमने तात्काळ संबंधीत वेबसाईट्सशी संपर्क साधून, चित्रपट हटविण्याची मागणी क ेली.
यापूर्वी ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, सुलतान, मांझी, सैराट यासारखे सिनेमे लीक झाले होते. त्यात आता कबालीचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, कबाली सिनेमा भारतासह जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे कबाली सिनेमाच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा भारतीय सिनेमा जगभरातील ५ हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे.
मलेशिया, चीन आणि थायलंड देशांच्या भाषेतही सिनेमा डब करण्यात आला असून, 22 जुलै रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. अमेरिकेमध्ये ‘कबाली’ ५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या सिनेमात रजनीकांत डॉन कबालीश्वरनच्या भूमिकेत असून, मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही मुख्य भूमिकेत आहे. तैवानचा सुपरस्टार विनस्टॉन चाओ याने सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे