‘या’ अभिनेत्रीने ‘दबंग’ गाण्यावर साडी घालून केला व्यायाम; चाहत्यांनी म्हटले, ‘साडी घालून बॉडी बिल्डिंग, क्या बात हैं’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 21:26 IST2018-06-01T15:56:23+5:302018-06-01T21:26:31+5:30

सध्या देशभरात फिटनेस चॅलेंज जोरात सुरू आहे. अशात एका अभिनेत्रीने अतिशय हटके अंदाजात हे चॅलेंज पूर्ण केले आहे. तिचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

Exercise by wearing a saree on the actress' Dabang singing; The fans said, 'Adding the Saadi body building, what's the matter'! | ‘या’ अभिनेत्रीने ‘दबंग’ गाण्यावर साडी घालून केला व्यायाम; चाहत्यांनी म्हटले, ‘साडी घालून बॉडी बिल्डिंग, क्या बात हैं’!

‘या’ अभिनेत्रीने ‘दबंग’ गाण्यावर साडी घालून केला व्यायाम; चाहत्यांनी म्हटले, ‘साडी घालून बॉडी बिल्डिंग, क्या बात हैं’!

िनेत्री अदा शर्मा हिच्या सर्वच अदा निराळ्या आहेत. भलेही चित्रपटात तिने फारशी लोकप्रियता मिळविली नाही, मात्र सोशल मीडियावर तिच्या अदांनी घायाळ होणाºयांची संख्या अगणित आहे. अदा शर्मा नियमितपणे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करीत असते. विशेष म्हणजे तिचे हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात बघितलेही जातात. अदाने आता तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये ती, एक भलेमोेठे लाकडी क्लबेल्स (ंमुदगल) फिरविताना दिसत आहे. पण हे सर्व ती कोण्या जीममध्ये नव्हे तर चक्क घराच्या छतावर करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे बॅकग्राउंडमध्ये सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटाच्या टायटल सॉन्गचा आवाज कानी पडत आहे. 

अदाने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले की, ‘हे फिट इंडिया चॅलेंज आहे, अशात पूर्णपणे भारतीय अंदाजात मी हे चॅलेंज पूर्ण करीत आहे. वर्कआउट आणि साडीला मी पेटेंट केले आहे. कृपा करून इतर अभिनेत्रींनी माझे साडी वर्कआउट कॉपी करू नये. फिट बॉडीसाठी जिम किंवा इतर साधनांची गरज नाही. नुकतेच महाराष्ट्राच्या सुदूर भागातील आखाड्यात गेली होती. तेथील फिटनेस लेवल बघून खूपच प्रभावित झाली. ते आपले वजन आणि देसी उपकरणांनी कसरत करतात. त्यातील एक लाकडाचे क्लबेल्स हे एक आहे. भारतात क्लबेल्सचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. त्याच्या वापरामुळे मांसपेशी मजबूत होतात. खांदे अधिक लवचिक होतात. एकूणच ही कसरत तुमचे संपूर्ण शरीर मजबूत करते. मी या क्लबेल्सचा वापर गेल्या सहा महिन्यांपासून करीत आहे.’
 

दरम्यान, अदाच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज चांगलाच पसंत येत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. एका चाहत्याने तिच्या या व्हिडीओला कॉमेण्ट देताना लिहिले की, ‘साडी घालून बॉडी बिल्डिंग, क्या बात है...’ तर आणखी एका चाहत्याने यास ‘सुपर्ब’ असे म्हटले. अदा शर्माने २००८ मध्ये ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिने ‘हम हैं राही कार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ यांसारख्या चित्रपटात काम केले. मात्र तिला खरी ओळख अभिनेता विद्युत जामवाल याच्यासोबतच्या ‘कमांडो-२’ या चित्रपटामुळे मिळाली.  

Web Title: Exercise by wearing a saree on the actress' Dabang singing; The fans said, 'Adding the Saadi body building, what's the matter'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.