Exclusive : वो कौन थी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 18:03 IST2016-06-14T08:50:48+5:302016-06-14T18:03:13+5:30
रणबीर कपूर त्याच्या काही मित्रांसोबत ब्रिच कँडीच्या एका नाईट क्लबमध्ये काही दिवसांपूर्वी पार्टी करत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या चार-पाच मित्रांसोबत ...

Exclusive : वो कौन थी?
र बीर कपूर त्याच्या काही मित्रांसोबत ब्रिच कँडीच्या एका नाईट क्लबमध्ये काही दिवसांपूर्वी पार्टी करत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या चार-पाच मित्रांसोबत त्याची धमालमस्ती सुरू होती. मजा-मस्ती करत असतानाच एका पबमध्ये एका मुलीचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. शेफाली मेहता या मुलीचा वाढदिवस होता. ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत हा खास दिवस साजरा करत होती. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला खूपच मोठे गिफ्ट मिळाले. स्वतः रणबीर तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. कोणत्याही फॅनसाठी इतके चांगले वाढदिवसाचे गिफ्ट मिळूच शकत नाही.