Exclusive : 'या' क्रिकेटरमुळे रणवीर सिंग बनला अभिनेता !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 15:26 IST2017-09-28T09:38:36+5:302017-09-28T15:26:41+5:30
लवकरच दिग्दर्शक कबीर खान 1983 साली भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्व कपचा प्रवास पडद्यावर उलगडणार आहे. यात रणवीर सिंग ...

Exclusive : 'या' क्रिकेटरमुळे रणवीर सिंग बनला अभिनेता !
ल करच दिग्दर्शक कबीर खान 1983 साली भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्व कपचा प्रवास पडद्यावर उलगडणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहेत. 1983 सालच्या विश्व विजेत्या संघाचे कर्णधारपद त्यांना भूषवले होते. रणवीर सिंग म्हणाला तुम्ही या देशात जन्माला आलात आणि क्रिकेटचे फॅन्स नाहीत असे होणे शक्यच नाही. मात्र क्रिकेटबद्दल प्रेम देशात 1983नंतर वाढले. रणवीर पुढे म्हणाला मी आज अभिनेता आहे ते मोहिंदर अमरनाथ यांच्यामुळे. रणवीरच्या वक्तव्याचा अर्थ कोणालाच लागत नव्हता. त्यावेळी रणवीरनेच खुलासा केला की सातवीत असताना शाळेतल्या मॅचमध्ये रणवीरने 46 बॉलमध्ये 71 रॅन्स केले होते. यानंतर रणवीरने आपल्या मित्रांसोबत अमरनाथ यांच्या खार इथल्या जीमखान्यात प्रवेश घेतला होते. रणवीरचे मित्र क्रिकेटला घेऊन खूपच सीरिअस होते आणि परिक्षेच्या वेळी ते वेळेवर पोहोचायचे. रणवीरला मात्र नेहमी उशीर व्हायचा आणि रणवीर पोहोचेपर्यंत अमरनाथ पिचवर असायचे. अमरनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे रणवीरने परीक्षा दिली ही मात्र यात तो फेल झाला आणि म्हणून आज इंडस्ट्रिला एक अष्टपैलू कलाकार मिळाला असे म्हटले तर वावगे ठरु नये. रणवीरचा हा किस्सा ऐकून अमरनाथ ही आश्चर्यचकित झाले होते. यासाठी आपण अभिनेता झाल्याचे क्रेडिट रणवीरने मोहिंदर अमरनाथ यांना दिले होते. रणवीरने आपल्या करिअरची सुरुवात यश राज 'बॅनरच्या बँड बाजा बरात' या चित्रपटातून अनुष्का शर्माच्या अपोझिट केली होती. मात्र त्याच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला तो संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी. यात रणवीने साकारलेला बाजीराव चित्रपट संपल्यानंतर ही अनेकांच्या मनात घर करुन गेला. यानंतर तो दिसणार आहे 'पद्मावती'मध्ये यात तो दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर सोबत झळकणार आहे. यात अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसले.
ALSO READ : चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यापूर्वी रणवीर सिंग घेणार १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाची भेट
रणवीर सिंगने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत मात्र कपिल देव यांची भूमिका पडद्यावर साकारणे हे त्याच्या समोर नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.
ALSO READ : चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यापूर्वी रणवीर सिंग घेणार १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाची भेट
रणवीर सिंगने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत मात्र कपिल देव यांची भूमिका पडद्यावर साकारणे हे त्याच्या समोर नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.