Exclusive : 'उरी' सिनेमाच्या टीमचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय, वाचून तुम्हाला ही वाटेल गर्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 14:37 IST2019-01-25T14:32:22+5:302019-01-25T14:37:14+5:30

उरी सिनेमाचा निर्मात रोनी स्क्रूवालाने आधीच उरीच्या कामाईमधून एक कोटी रुपये शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी दिलीय. यानंतर आणखी एक अभिमानास्पद निर्णय उरीच्या टीमने घेतला आहे

Exclusive: A proud decision of the film team of 'Uri' will be proud of you | Exclusive : 'उरी' सिनेमाच्या टीमचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय, वाचून तुम्हाला ही वाटेल गर्व

Exclusive : 'उरी' सिनेमाच्या टीमचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय, वाचून तुम्हाला ही वाटेल गर्व

ठळक मुद्देउरी सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 26 जानेवारीला उरीची टीम वाघा बॉर्डरवर जाऊन प्रजासत्ताक दिन जवानांसोबत साजरा करणार आहे

उरी सिनेमाचा निर्मात रोनी स्क्रूवालाने आधीच उरीच्या कमाईमधून एक कोटी रुपये शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी दिलीय. यानंतर आणखी एक अभिमानास्पद निर्णय उरीच्या टीमने घेतला आहे. 26 जानेवारीला उरीची टीम वाघा बॉर्डरवर जाऊन प्रजासत्ताक दिन जवानांसोबत साजरा करणार आहे. 


उरी सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा सिनेमा आहे.उरी सिनेमाचे डायलॉग रसिकांना खूपच आवडले आहेत.‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’ हे डायलॉग रसिकांना खूपच भावले. चित्रपटाची कथा विहान शेरगिल या भारतीय जवानाभोवती फिरते. ही भूमिका विकी कौशलने साकारली आहे. तूर्तास विकीच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. दिग्दर्शक आदित्य धारने सर्जिकल स्ट्राइकच्या १० दिवसांतील चित्तथरारक घटना मोठ्या पडद्यावर उत्तमरीत्या रेखाटल्या असून, हे प्रसंग पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.  यामी गौतमच्या वाटेला छोटी भूमिका आली आहे;  मात्र या छोट्या भूमिकेलाही तिने योग्य न्याय दिला आहे. परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या भूमिका छोट्या - छोट्या असल्या तरी त्यांनी त्या सक्षमपणे साकारल्या आहेत. आतापर्यंत आपण अनेक वेळा सर्जिकल स्ट्राइकबाबत वाचलेय किंवा ऐकलेय; मात्र ही संपूर्ण घटना रुपेरी पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरते.  

Web Title: Exclusive: A proud decision of the film team of 'Uri' will be proud of you