Exclusive मुलाखत : शाहरूख म्हणतो, मी वेगळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 15:39 IST2016-04-11T23:19:01+5:302016-04-12T15:39:28+5:30
किंगखान शाहरूख खान म्हणजे, लाखों दिलांची धडकन... शाहरूखचा ‘फॅन’ हा चित्रपट येत्या १५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाठोपाठ ‘रईस’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या ...

Exclusive मुलाखत : शाहरूख म्हणतो, मी वेगळा
किंगखान शाहरूख खान म्हणजे, लाखों दिलांची धडकन... शाहरूखचा ‘फॅन’ हा चित्रपटयेत्या १५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाठोपाठ ‘रईस’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. शाहरूख जसा, हजारो-लाखो चाहत्यांचा हिरो तसाच मुलांवर जीव ओवाळून टाकणारा एक पिता आणि पत्नीवर निरअतिशय प्रेम करणारा पती. आपल्या मुलांबद्दल शाहरूख सोशल मीडियावर भरभून बोलतो पण तरीही त्याच्याबद्दलचे आकर्षण कमी होत नाही. शाहरूख व्यक्तिगत आयुष्यात कसा आहे, एक व्यक्ति म्हणून कसा आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. नेमका हाच प्रश्न आम्ही शाहरूखला विचारला.‘यार मेरा सुपरस्टार’ या शोच्या सेटवर ‘लोकमत सीएनएक्स डिजिटल’शी बोलताना शाहरूखने यावर मनमोकळेपणे उत्तर दिले. बघूयात, शाहरूख काय बोलला ते...
गेल्या २५ वर्षांच्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये कुटुंबासोबतच शाहरूखने मित्रही जपले. या मित्रांबाबत शाहरूखला प्रश्न विचारल्यावर शाहरूख म्हणतो,
मला अनेक चांगले मित्र आहेत, याचा मला अभिमान आहे. मात्र अनेकदा मी त्यांच्या संपर्कात राहू शकत नाही, त्यांच्याशी वेळ घालवू शकत नाही, याची मला खंत वाटते.
व्यक्ति म्हणून शाहरूख कसा आहे? यावर शाहरूख म्हणतो, मी गोड व्यक्ति आहे, प्रेमळ आणि मायाळू व्यक्ति आहे. माझे अनेक मित्र मला ‘केअर टेकर’ म्हणतात. माणसांबद्दल मला मनापासून जिव्हाळा वाटतो.
प्रत्येकाला स्वत:त काही कमतरता आहे, असे वाटत असते, शाहरूखलाही असे वाटत असावे का, याबाबत विचारल्यावर तो म्हणतो, मी लोकांसाठी हिरो आहे. पण अगदी व्यक्तिगत पातळीवर म्हणाल तर मी थोडा वेगळा आहे. मी अनेकांना भेटतो. पण मी फारसा त्यांच्या संपर्कात राहत नाही. ‘कम्युनिकेशन प्रॉब्लेम’ ही माझी कायमची समस्या आहे. संवादात मी कमी पडतो. खासगी आयुष्यात मी फारसा व्यक्त होत नाही. अनेकदा मी माझ्याच कोशात वावरत असतो.मी इतरांपेक्षा वेगळा आहे, पण कसा ते मला नेमके सांगता येणार नाही. मी वेगळा आहे आणि भावनिकही आहे. म्हणून मी अनेकदा स्वत:साठी एक शब्द वापरतो ‘डिमोशनल’ (detached +emotional). कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात मी ढवळाढवळ करीत नाही.