Exclusive Interview : ऑस्कर नामांकित न्यूटन चित्रपटाचा दिग्दर्शक अमित मसुरकरने सांगितले चित्रपटाच्या बाबतीतले हे खास सिक्रेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 12:02 IST2017-09-25T06:02:46+5:302017-09-25T12:02:25+5:30

मराठमोळा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरच्या 'लगान'नंतर आणखीन एक मराठमोळा दिग्दर्शकाने ऑस्करमध्ये जाण्याचा मान मिळवला आहे. तो म्हणजे न्यूटनचा दिग्दर्शक अमित ...

Exclusive Interview: Oscar-nominated Newton film director Amit Masroor said that these special secrets | Exclusive Interview : ऑस्कर नामांकित न्यूटन चित्रपटाचा दिग्दर्शक अमित मसुरकरने सांगितले चित्रपटाच्या बाबतीतले हे खास सिक्रेट्स

Exclusive Interview : ऑस्कर नामांकित न्यूटन चित्रपटाचा दिग्दर्शक अमित मसुरकरने सांगितले चित्रपटाच्या बाबतीतले हे खास सिक्रेट्स

ाठमोळा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरच्या 'लगान'नंतर आणखीन एक मराठमोळा दिग्दर्शकाने ऑस्करमध्ये जाण्याचा मान मिळवला आहे. तो म्हणजे न्यूटनचा दिग्दर्शक अमित मसुरकरने ऑस्कर 2018 पुरस्काराच्या शर्यतीत एंट्री घेतली आहे. अमितने आपल्या करिअरची सुरुवात लेखक म्हणून केली. न्यूटन चित्रपटाच्या निमित्ताने अमितचा आता पर्यंतचा प्रवासबाबत त्याच्याशी मारलेल्या 'या' खास गप्पा.   

न्यूटनच्या चित्रिकरणाचा अनुभव कसा होता ?
न्यूटनच्या संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझा मित्र आहे जावेद इक्बाल त्यांनी काही फोटो काढले होते त्या फोटोंना बघून कला दिग्दर्शकला तसेच गाव शूटिंगसाठी शोधून काढावे लागले. आमचा कॅमेरामन स्वप्निल सोनावणेला आम्ही जंगलात शूट करत असल्याने खूप रिसर्च करावे लागेल की नेमके शूट कसे करायचे आहे.  मी आणि न्यूटनचा लेखक मयांक तिवारींने कथे लिहिण्याआधी तिकडच्या लोकांना जाऊन भेटलो त्यांच्याशी बोललो, तिकडच्या पत्रकारांशी, अधिकाऱ्यांनी तिथल्या परिस्थितीबाबत जाणून घेतल्यानंतर त्यांने कथा लिहायला सुरुवात केली. एकूणच या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. एखादी चांगली कलाकृती तयार करण्यासाठी सगळ्यांचा उद्देश एकच असाला पाहिजे तर ती कलाकृती चांगली तयार होते.  

राजकुमार रावची निवड या भूमिकेसाठी का करण्यात आली ?
राजकुमार राव हा एक अष्टपैलू अभिनेता आहे. मी त्याला खूप आधीपासून ओळखायचो. तो ही भूमिका चांगल्या पद्धतीने करु शकले याची मला संपूर्ण खात्री होती. तसेच या चित्रपटाचे निर्मात्यांनी सुद्धा कथा ऐकल्यावर पहिले राजकुमार रावचे नाव सुचवले आणि मला ही त्याच्यावरच विश्वास होता. त्यामुळे त्याचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानेही ही भूमिका साकारण्यासाठी होकार दिला आणि चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात आली. 

तुझा चित्रपटसृष्टीतील प्रवास नेमका कधी आणि कसा सुरु झाला ?
माझ्या प्रवासाला मी छोट्या पडद्यापासून सुरुवात केली. मी आधी टीव्हीसाठी लिहित होतो. मग चित्रपटासाठी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि सुलेमानी किडा चित्रपट तयार केला. मी फक्त आपले काम करत होतो आणि गोष्टी घडत गेल्या. अजूनही बरेच काही नवे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

चित्रपटाने ऑस्करमध्ये एंट्री मारल्यानंतर तुझ्या नेमक्या काय भावना आहेत ?
ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे हे कळल्यावर आमच्या संपूर्ण टीमला या गोष्टीचा आनंदच झाला. तसेच चित्रपट रिलीजच्या दिवशीच ऑस्करमध्ये एंट्री घेतल्याची घोषणा झाली. त्यामुळे याचा बराच फायदा आम्हाला झाला. बरेच प्रेक्षक चित्रपट पाहायला जातायेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 


चित्रपट तयार करताना न्यूटन ऑस्करपर्यंत मजल मारेल असे वाटले होते का ?
नाही असे काही वाटले नव्हते कारण चित्रपट तयार करताना आपण आपली गोष्ट प्रेक्षकांनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशी काही अपेक्षा त्यावेळी नव्हती. 

राजकुमार रावसह एक मराठमोळा चेहरा अंजली पाटीलचा ही यात झळकणार आहे, याबदल काय सांगशील ?
अंजलीचा अभिनय मी याआधी दोन चित्रपटात बघितला होता. एका श्रीलंकन चित्रपटात तिने तामिळ मुलीची भूमिका साकारली होती तसेच प्रकाश झा दिग्दर्शित चक्रव्यूह चित्रपटात तिने काम केले होता. या चित्रपटातून नक्शलवाद्यांचा विषय मांडण्यात आला होता. अंजलीने यात नक्शलवाद्यांच्या भूमिकेत झळकली होती त्यामुळे तिला या भागाची संपूर्ण माहिती होती. अंजली प्रत्येक भूमिकेला आपले करते ही त्याची खास गोष्ट मला माहिती होती. त्यामुळे या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली. 

ALSO READ :   ​वाचा, ‘कॉपी’च्या आरोपावर ‘न्यूटन’चे दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा खुलासा!

Web Title: Exclusive Interview: Oscar-nominated Newton film director Amit Masroor said that these special secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.