पार्श्वगायक कुमार सानू यांच्या विरोधात वक्तव्यास विभक्त पत्नीला मनाई; बदनामीप्रकरणी दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:32 IST2026-01-23T10:29:04+5:302026-01-23T10:32:18+5:30

रिता भट्टाचार्य यांना संयम दाखवण्याचे न्यायालयाने दिले निर्देश

Ex-wife banned from making statements against playback singer Kumar Sanu; defamation case filed | पार्श्वगायक कुमार सानू यांच्या विरोधात वक्तव्यास विभक्त पत्नीला मनाई; बदनामीप्रकरणी दावा

पार्श्वगायक कुमार सानू यांच्या विरोधात वक्तव्यास विभक्त पत्नीला मनाई; बदनामीप्रकरणी दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पार्श्वगायक कुमार सानू यांच्या विरोधात कोणतीही बदनामीकारक वक्तव्ये वा टिप्पणी करण्यास त्यांची विभक्त पत्नी रिता भट्टाचार्य यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी मनाई केली. भट्टाचार्य यांनी  संयम ठेवून सानू यांच्या प्रतिमेला आणखी हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे न्यायालयाने स्पष्टपणे बजावले.

रिता भट्टाचार्य तसेच काही स्वतंत्र माध्यम संस्थांनी आपल्याविरोधात खोटे, बदनामीकारक, अपमानास्पद लिखाण, वक्तव्ये, पोस्टस प्रसारित केल्याचा आरोप कुमार सानू यांनी केला आहे. त्याचबरोबर रिता यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे.

प्राथमिक नोंदी तपासल्यानंतर भट्टाचार्य यांना सानू यांच्याविरोधात आकस असल्याचे निदर्शनास येते असे निरीक्षण न्या. मिलिंद जाधव यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने नोंदविले. न्यायालयाने भट्टाचार्य, संबंधित स्वतंत्र माध्यम संस्थांना सानू यांच्या विषयी बदनामीकारक वक्तव्ये करण्यास मनाई केली. भट्टाचार्य यांच्या वतीने ॲड. अतिफ शेख यांनी हा वाद मध्यस्थांकडे पाठवावा, अशी विनंती केली.

प्रकरण काय?

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये यूट्यूब चॅनेल्सना दिलेल्या मुलाखतीत भट्टाचार्य या सानू यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. ती क्लिप्स आणि रील्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. त्यातून आपले आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान झाले तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला. परदेशातील नियोजित कार्यक्रमही रद्द करावे लागले, असा दावा सानू यांनी केला आहे.

Web Title : कुमार सानू की पूर्व पत्नी को मानहानिकारक बयान देने से रोका गया; मानहानि का मुकदमा

Web Summary : उच्च न्यायालय ने कुमार सानू की पूर्व पत्नी को मानहानिकारक बयान देने से रोका। सानू ने मानहानि का मुकदमा दायर किया, जिसमें झूठे बयानों से वित्तीय और व्यक्तिगत नुकसान का दावा किया गया, जिससे विदेशी शो रद्द हो गए। अदालत ने शत्रुता देखी। मध्यस्थता अनुरोध की गई।

Web Title : Kumar Sanu's Ex-Wife Restrained from Defamatory Statements; Sues for Defamation

Web Summary : High Court restrains Kumar Sanu's ex-wife from making defamatory statements. Sanu sues for defamation, claiming false statements caused financial and personal damage, leading to cancelled foreign shows. Court observed animosity. Mediation requested.