माजी ‘मिस जम्मू’ अनारा गुप्ता ठरली ‘मिस ठगबाज’! चित्रपटांच्या नावावर २०० कोटींची फसवणूक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 14:15 IST2017-12-05T08:45:19+5:302017-12-05T14:15:19+5:30
‘मिस जम्मू’ अनारा गुप्ता ही २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोपामुळे चर्चेत आली आहे. होय, कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ...

माजी ‘मिस जम्मू’ अनारा गुप्ता ठरली ‘मिस ठगबाज’! चित्रपटांच्या नावावर २०० कोटींची फसवणूक!!
‘ िस जम्मू’ अनारा गुप्ता ही २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोपामुळे चर्चेत आली आहे. होय, कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिस अनारासह अनेक लोकांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करू शकतात. चित्रपट बनवण्याच्या नावावर अनाराने अनेकांना ठगवले असल्याचा आरोप आहे. तूर्तास अजय देवगणचा चित्रपट ‘दिलवाले2’ बनवण्याच्या नावावर २०० कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झााले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफने दोघांना अटक केली आहे. अटकेतील या दोघांनी या प्रकरणात अनाराच्या नावाचा खुलासा केला आहे.
![]()
वाराणसीचा शत्रूघ्न या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. शत्रूघ्न मुंबईच्या एका बँकेत नोकरी करायचा. याचदरम्यान भोजपुरी अभिनेता अंबरिश सिंहसोबत त्याची ओळख झाली. अंबरीशच्या मदतीने तो ब्ल्यू फॉक्स कंपनीचा डायरेक्टर अरूण गौतमसोबत भेटला. अरूणने शत्रूघ्नची ओळख मुंबईची अभिनेत्री अर्पिता माळी उर्फ सारिका सुमन आणि प्रदीप शर्मासोबत करून दिली. अर्पिता व प्रदीपला सोबत घेऊन शत्रुघ्नने प्रॉडक्शन हाऊस उघडले. या कंपनीला पुढे नेण्यासाठी माजी मिस जम्मू अनारा गुप्ताला यात सामील केले गेले. अनारा मोठ मोठ्या शहरात सेमिनार घेऊन लोकांना या कंपनीशी जोडायची. यानंतर ती कंपनीच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरमध्येही सामील झाली. कमाईची मोठ्ठी रक्कम अनाराला मिळायला लागली. पुढे लोकांच्या डोळ्यांत धूळ झोकण्यासाठी कंपनीचे नाव बदलले गेले. मग हे लोक पैसे दुप्पट करण्याची स्किम चालवायला लागले. अनाराच्या वाढत्या प्रस्थामुळे अर्पिता नाराज झाली आणि तिने संबंधित चिट फंड कंपनीविरोधात सेबी व रिझर्व्ह बँकेकडे तक्रार दाखल केली.
गतवर्षी अनाराची सेक्स सीडी बाजारात मिळायला लागल्यानंतर ती चर्चेत आली होती. वास्तविक या प्रकरणातून अनाराची निर्दोष मुक्तता झाली. त्या काळात तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. तिने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. ‘माझ्यासोबत ती दूर्घटना घडली तेव्हा मी फक्त १६ वर्षांची होते. त्या काळात मी दोन वेळाआत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझ्या नावाचा वापर त्या सीडीत करण्यात आला होता. मी १३ वर्षांची होते तेव्हा मिस जम्मू निवडल्या गेले होते. माझ्यावर तिथल्या एका आमदाराच्या मुलाची वाईट नजर होती’, असे तिने सांगितले होते.