'अशा' मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे सुपरबोल्ड ईशा गुप्ता, तुमच्यात आहे का हे गुण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 19:16 IST2021-12-24T19:14:26+5:302021-12-24T19:16:44+5:30

Esha Gupta : ईशाला लग्नासाठी कसा मुलगा हवा याचा तिने खुलासा केला आहे. ईशाने एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा?

Esha Gupta is ready to marry such a boy who has these qualities | 'अशा' मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे सुपरबोल्ड ईशा गुप्ता, तुमच्यात आहे का हे गुण?

'अशा' मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे सुपरबोल्ड ईशा गुप्ता, तुमच्यात आहे का हे गुण?

बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) आपल्या बोल्ड ड्रेसेस आणि हॉट लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. ईशा सध्या मॅनुअल कॅंपोस ग्वालर याला डेट करत आहे. इतकंच काय तर तिने तिच्या स्पॅनिश बॉयफ्रेन्डसोबत सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला होता. पण ईशाला लग्नासाठी कसा मुलगा हवा याचा तिने खुलासा केला आहे. ईशाने एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा?

हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, ईशा गुप्ताने तिच्या खाजगी आयुष्याबाबत आणि कुणासोबत नाव जोडलं गेल्याबाबत बोलली. ईशा म्हणाली की, 'लोकांना फक्त हे माहीत आहे की, मी किती वेळ लावत आहे आणि त्यांना वाटतं की त्यांना सगळं काही माहीत आहे. पण परिवार आणि मित्रांबाबत मी फार प्रायव्हेट पर्सन आहे. लोक माझ्याबाबत खूपकाही लिहितात. पण त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही'.

ईशा म्हणाली की, 'तिला या गोष्टीने फार दु:खं होतं की, पुरूषांना लग्नाबाबत फार कमी प्रश्न विचारले जातात. महिलांची लग्नाबाबत फार लवकरच चर्चा होऊ लागते. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात जाण्याआधी मला योग्य वेळेची वाट बघायची आहे'.

कसा नवरा हवा?

कसा पार्टनर हवा याबाबत बोलताना ईशा गुप्ता म्हणाली की, 'माझ्या परिवाराता पुरूषांच्या तुलनेत महिला जास्त आहेत. आमच्या इथे पालकांनी मुलींना फार स्वतंत्र ठेवलं आहे. जर मी एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न केलं आणि नंतर त्याने मला सोडलं तर मला पोटगीवर माझं आयुष्य जगायचं नाहीये. मला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. मला माझं सरनेम बदलायचं नाहीये. असा पार्टनर हवा जो मला सपोर्ट करेल आणि मला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही'.
 

Web Title: Esha Gupta is ready to marry such a boy who has these qualities