'त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला...', सिनेमाच्या प्रीमिअरला ईशा देओलसोबत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:41 IST2024-09-14T11:40:29+5:302024-09-14T11:41:10+5:30

सिनेमाच्या प्रीमिअरला गर्दीचा फायदा घेत त्याने स्पर्श केला. यानंतर ईशाने...

Esha Deol recalls at a movie premiere man touched her inappropriately she then slapped him | 'त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला...', सिनेमाच्या प्रीमिअरला ईशा देओलसोबत काय घडलं?

'त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला...', सिनेमाच्या प्रीमिअरला ईशा देओलसोबत काय घडलं?

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओलने (Esha Deol) इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. ईशाचा काही महिन्यांपूर्वीच पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट झाला. आता ती एकटी मुलींचा सांभाळ करत आहे. सोबतच तिने पुन्हा काम करायला सुरुवात केली आहे. एका मुलाखतीत ईशाने सिनेमाच्या प्रीमिअरला तिला एका माणसाने चुकीचा स्पर्श केला होता असा खुलासा केला.

मेल फेमिनिस्टच्या एका एपिसोडमध्ये ईशा देओल म्हणाली, "दस सिनेमाच्या प्रीमिअर इव्हेंटला ही घटना घडली. प्रीमिअरला माझ्यासोबत संजय दत्त, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन असे मोठे स्टार होते. तसंच माझ्या आजूबाजूला तगडे बाऊन्सर्सही होते. जेव्हा मी प्रीमिअर ठिकाणी एन्ट्री घेत होते तेव्हा गर्दीतील एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्याच क्षणी मी त्याचा हात धरला आणि गर्दीतून त्याला बाहेर ओढलं. मी तिथेच त्याच्या कानाखाली लगावली."

ती पुढे म्हणाली, "मी शॉर्ट टेम्पर्ड व्यक्ती मुळीच नाही. माझं स्वत:वर नियंत्रण असतं.  पण जर कोणी मर्यादा पार केली तर मी सहन करत नाही. अशा घटनांमध्ये महिलांनी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. पुरुष शारिरीकरित्या ताकदवान असतात याचा अर्थ हा नाही की ते महिलांचा फायदा घेतील. महिला भावनिकरित्या स्ट्राँग असतात. अशा प्रकारचं वर्तन आपण सहन करता कामा नये."

ईशा देओल विक्रम भट दिग्दर्शित 'तुमको मेरी कसम' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये अदा शर्मा, अनुपम खेर यांचीही भूमिका आहे. 

Web Title: Esha Deol recalls at a movie premiere man touched her inappropriately she then slapped him