घटस्फोटानंतर ईशा देओलचं बिग स्क्रीनवर कमबॅक, अदा शर्मासोबत 'या' सिनेमात झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:27 IST2024-08-13T15:26:25+5:302024-08-13T15:27:30+5:30
ईशा देओल आगामी सिनेमाच्या इव्हेंटमध्ये स्टायलिश लूकमध्ये सहभागी झाली होती.

घटस्फोटानंतर ईशा देओलचं बिग स्क्रीनवर कमबॅक, अदा शर्मासोबत 'या' सिनेमात झळकणार
हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलचा (Esha Deol) काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला. ईशाचा १२ वर्षांचा संसार मोडला. आपल्या दोन्ही लेकींसोबत ईशा पती भरत तख्तानीपासून वेगळी राहत होती. आता दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे जात आहेत. ईशा लवकरच सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे. विक्रम भट यांच्या सिनेमातून ती पुन्हा स्क्रीनवर दिसणार आहे.
ईशा देओल आगामी सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. 'तुमको मेरी कसम' असं सिनेमाचं नाव आहे. विक्रम भट यांचा हा सिनेमा असून यामध्ये अदा शर्मा, अनुपम खेर आणि इश्वाक सिंह हे कलाकारही आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने इन्स्टाग्रामवर इव्हेंटचा व्हिडिओ शेअर केला आहे. ईशा देओल यावेळी अदा शर्माच्या बाजूला बसली होती. प्रिंटेड स्कीन टाईट गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
ईशा देओलला बऱ्याच वर्षांनी स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विक्रम भट यांनी एक नाही तर चार सिनेमांची घोषणा केली आहे. 'तुमको मेरी कसम' शिवाय 'रण', 'विराट' आणि 'तू मेरी पूरी कहानी' हे देखील सिनेमे येणार आहेत. 'तुमको मेरी कसम' मध्ये ईशा मुख्य भूमिकेत असून तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळतोय.
फेब्रुवारी महिन्यात ईशा देओल आणि भरत तख्तानीचा घटस्फोट झाला. त्यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. सध्या दोन्ही मुलींची कस्टडी ईशा जवळच आहे.