Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 10:14 IST2023-09-20T10:13:01+5:302023-09-20T10:14:31+5:30

jawan: एका डान्सरकडून झालेली चूक या अभिनेत्रीच्या जीवावर बेतली असती.

entertainment-news-shah-rukh-khans-jawan-actress-aaliya-qureshi-shared-the-experience-when-she-met-with-an-accident-on-movie-set | Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण

Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण

बॉलिवूड किंग खान शाहरुख खान (Shah rukh khan) याचा जवान (jawan movie) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. ७ सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने ५०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. त्यामुळे या सिनेमाची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. या सिनेमामध्ये साऊथपासून मराठीपर्यंत अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. विशेष म्हणजे सध्या या सिनेमाविषयी अनेक चर्चा रंगत असून सेटवर एका अभिनेत्रीसोबत मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे.

अलिकडेच या सिनेमातील अभिनेत्री आलिया कुरेशी हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सेटवर घडलेल्या अपघाताविषयी भाष्य केलं. जिंदा बंदा या गाण्यात सिनेमातील जवळपास सगळ्याच मुख्य अभिनेत्री झळकल्या होत्या. मात्र, या गाण्याचं शूट करत असताना आलियासोबत मोठा अपघात घडला. त्यामागचं कारण नुकतंच तिने सांगितलं आहे.  "या गाण्याचं शूट करत असताना माझ्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली होती.  ड्रान्सची प्रॅक्टिस करत असताना तेथील एका डान्सच्या हातून डफ निसटला आणि तो थेट माझ्या डोक्यावर पडला. तेव्हा, अॅटली सरांनी मला घरी जाऊन आराम करायच्या सल्ला दिला," असं आलियाने सांगितलं.

कधी झाला नाच्या तर कधी झाला गावासमोर नग्न; 'जवान'मधील त्या शेतकऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

पुढे ती म्हणते, "सुरुवातीचे २ दिवस मला नीट चालताही येत नव्हतं. माझ्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. पण तिसऱ्या दिवशी मी पेनकिलर औषध घेतली. त्यानंतर जिंदा बंदा या गाण्याचं शूट करण्यासाठी पुन्हा परतले. शाहरुख सरांसोबत डान्स करायची संधी रोज-रोज थोडीच मिळते, मग ती कशी काय सोडणार?.

दरम्यान, या सिनेमामध्ये शाहरुखसोबत अनेक नवीन चेहरे झळकले आहेत. यात आलिया कुरेशी,लहर खान आणि संजीता भट्टाचार्य या नवोदित अभिनेत्री आहेत. तर, प्रियामणि, गिरीजा ओक आणि सान्या मल्होत्रा या गाजलेल्या अभिनेत्रींनी शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

Web Title: entertainment-news-shah-rukh-khans-jawan-actress-aaliya-qureshi-shared-the-experience-when-she-met-with-an-accident-on-movie-set