बॉलिवूडमधील "सिरियल किसर" इमेजवर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला- "माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:15 IST2024-07-11T12:14:06+5:302024-07-11T12:15:08+5:30
'मर्डर' या सिनेमात इंटिमेट सीन देऊन इमरान हाशमी प्रसिद्धीझोतात आला होता. बॉलिवूडचा "सिरियल किसर" अशी त्याची ओळख बनली. आता पहिल्यांदाच इमरान हाशमीने त्याच्या या इमेजबद्दल भाष्य केलं आहे.

बॉलिवूडमधील "सिरियल किसर" इमेजवर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला- "माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष..."
'मर्डर', 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज ३', 'जहर', 'गँगस्टर : अ लव्ह स्टोरी' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनेता इमरान हाशमीने काम केलं आहे. 'मर्डर' या सिनेमात इंटिमेट सीन देऊन इमरान हाशमी प्रसिद्धीझोतात आला होता. बॉलिवूडचा "सिरियल किसर" अशी त्याची ओळख बनली. आता पहिल्यांदाच इमरान हाशमीने त्याच्या या इमेजबद्दल भाष्य केलं आहे.
इमरान हाशमी त्याच्या 'शोटाइम' या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत इमरानने त्याच्या बॉलिवूडमध्ये असलेल्या "सिरियल किसर" या इमेजबद्दल भाष्य केलं. शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला, "अनेक कलाकारांची एक पेटंट गोष्ट बनते. त्यांची एक इमेज सेट होते. आणि लोकही त्यांना त्याच दृष्टीकोनातून बघतात. ही इमेज त्यांची साथ सोडत नाही". हे सांगताना त्याने शाहरुख खान आणि सलमान खानचं उदाहरण दिलं. शाहरुखची सिग्नेचर पोझ आणि सलमान त्याच्या सिनेमात शर्ट काढतो. तर अनिल कपूर यांचा झकास हा डायलॉग...या कलाकारांच्या पेटंट गोष्टी आहेत.
"सिरियल किसर" इमेजमुळे त्रास होतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना इमरान पुढे म्हणाला, "मी यासाठी प्रेक्षकांना दोष देणार नाही. २००९ पर्यंत माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष निर्मात्यांनी माझी हिच इमेज विकली आहे. मीदेखील तेच करत होतो. बॉलिवूडमध्ये असं कॅरेक्टर आणि बोल्डनेस प्रेक्षकांना कधीच पाहिला नव्हता. माझ्या भूमिका या कलंकित होत्या आणि अनैतिक कामं करताना दाखवल्या जायच्या. बॉलिवूडच्या हिरोप्रमाणे त्या प्रामाणिक नव्हत्या," असंही पुढे इमरान म्हणाला.
दरम्यान, इमरान हाशमीच्या 'शोटाईम' या वेब सीरिजचा पहिला सीझन ८ मार्चला प्रदर्शित झाला होता. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील या सीरीजला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. या सीरिजमध्ये इमरान हाशमी, मौनी रॉय, महिमा मखवाना, श्रीया सरन, राजीव खंडेलवाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता १२ जुलैला या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.