इमरान हाश्मी ऐश्वर्या रायला म्हणाला होता 'प्लास्टिक'; आता इतक्या वर्षींनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 12:03 PM2024-03-08T12:03:02+5:302024-03-08T12:04:04+5:30

काही वर्षांपूर्वी 'कॉफी विद करण'मध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्याची प्लास्टिकशी तुलना केली होती.

Emraan Hashmi had compared Aishwarya Rai to Plastic explained after so many years | इमरान हाश्मी ऐश्वर्या रायला म्हणाला होता 'प्लास्टिक'; आता इतक्या वर्षींनी दिलं स्पष्टीकरण

इमरान हाश्मी ऐश्वर्या रायला म्हणाला होता 'प्लास्टिक'; आता इतक्या वर्षींनी दिलं स्पष्टीकरण

बॉलिवूडमध्ये 'सीरियल किसर' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी सध्या चर्चेत आहे. 'शोटाईम' ही त्याची वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सने या सीरिजची निर्मिती केली आहे. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या 'कॉफी विद करण' शोमध्ये इमरान हाश्मीने केलेल्या एका वक्तव्याची खूप चर्चा झाली होती. ऐश्वर्या रायला त्याने प्लास्टिक म्हटलं होतं.  आता इतक्या वर्षांनी त्याने त्या जुन्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

इमरान हाश्मी म्हणाला, "त्या शोमध्ये बोललेल्या सर्व गोष्टी मस्करीत होत्या. गिफ्ट हँपर जिंकण्यासाठी मी तसं उत्तर दिलं होतं. तेव्हा सगळेच खूप मोठ्या मनाचे होते. कोणीही कोणावरची मस्करी गांभीर्याने घेत नव्हतं. पण आता सगळं बदललं आहे. तुम्ही जर एखाद्याच्या मनाला लागेल असं बोललात तर ते लोक तुमच्यावर तुटून पडतात. मला नाही माहित आपण सगळे नक्की कोणत्या दिशेला चाललो आहोत आजकाल आपण सगळे अशाच जगात वावरत आहोत. पण त्या काळी असं नव्हतं."

तर काहीच दिवसांपूर्वी इमरान हाश्मीने कंगनाच्या नेपोटिझम वादावरही सडेतोड  उत्तर दिले होते. तो म्हणाला होता की, "तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीला ड्रगिस्ट म्हणू शकत नाही. हे अगदी चुकीचं आहे. कोरोना आणि सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर नेपोटिझमचा मुद्दा फारच पेटला आहे. कंगनाला गँगस्टरमध्ये लीड रोल मिळाला होता. तिथे नेपोटिझम तर झालं नाही."

इमरान हाश्मीची 'शोटाईम' ही वेबसीरिज आजपासून हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. फिल्म इंडस्ट्रीची काळी बाजू या शोमधून उलडण्यात आली आहे. मौनी रॉय, महिमा मकवाना, नसीरुद्दीन शाह, श्रिया सरन, राजीव खंडेलवाल यांचीही यामध्ये भूमिका आहे.

Web Title: Emraan Hashmi had compared Aishwarya Rai to Plastic explained after so many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.