वडिलांच्या निधनानंतर सुनील शेट्टीने लिहिला भावनिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 21:54 IST2017-03-10T16:21:35+5:302017-03-10T21:54:37+5:30

अभिनेता सुनील शेट्टी याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून, सुनील वडिलांच्या जाण्याने सावरू शकला नाही. त्याने सोशल मीडियावर नुकताच ...

The emotional message written by Sunil Shetty after the death of his father | वडिलांच्या निधनानंतर सुनील शेट्टीने लिहिला भावनिक संदेश

वडिलांच्या निधनानंतर सुनील शेट्टीने लिहिला भावनिक संदेश

िनेता सुनील शेट्टी याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून, सुनील वडिलांच्या जाण्याने सावरू शकला नाही. त्याने सोशल मीडियावर नुकताच एक भावनिक संदेश पोस्ट केला असून, त्यामध्ये ‘आपण ज्याच्यावर प्रेम करतो, तो आपल्यापासून कधीच दूर जात नसतो, तो नेहमीच आपल्यासोबत असतो’ असे लिहिले आहे. यावेळी सुनीलने समुद्र काठावर पायाचे ठसे उमटविलेला एक फोटोही शेअर केला आहे. 

सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेटी (९३) यांचे १ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी शेट्टी परिवाराचे सांत्वन केले होते. वरळी येथील स्मशानभूमीत अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी सुनील शेट्टी याने सर्व मित्र परिवार व हितचिंतकांचे आभार मानले होते. 

वडिलांच्या हयातीत सुनील शेट्टी याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, त्याचे वडील खºया अर्थाने हिरो आहेत. कारण माझ्या वडिलांनी एका रेस्टॉरंटमध्ये प्लेट धुण्याचे काम करून आमचा सांभाळ केला आहे. त्यामुळे माझे वडील माझ्यासाठी खरे हिरो आहेत. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षीच कष्ट करायला सुरुवात केली होती. माझे वडील बºयाचदा पोत्यावर झोपत असत. 

जेव्हा सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी बॉलिवूड डेब्यू करण्याची तयारी करीत होती, तेव्हा सुनील शेट्टी वडिलांच्या तब्येतीची काळजी घेत होता. त्यामुळे त्याला मुलीच्या करिअरकडे फारसे लक्ष देता आले नाही. वडिलांच्या आजारपणामुळे त्याने घरातच आयसीयू रूम तयार केली होती. सुनील त्याच्या वडिलांच्या खूप क्लोज होता. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर हे स्पष्ट होतेच. 

Though I saw it coming, it still hurts. RIP Papa . Thank you all...Family friends & well wishers for ur prayers

Web Title: The emotional message written by Sunil Shetty after the death of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.