हॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री अभय देओलच्या सिनेमातून करणार पदार्पण, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 06:30 IST2019-08-23T06:30:00+5:302019-08-23T06:30:00+5:30
बॉलिवूडचा अभिनेता अभय देओलचा 'जंगल क्राय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री अभय देओलच्या सिनेमातून करणार पदार्पण, पहा तिचे फोटो
बॉलिवूडचा अभिनेता अभय देओलचा 'जंगल क्राय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत हॉलिवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री एमिली शाह झळकणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
एमिली शाहने वयाच्या १८व्या वर्षी म्हणजेच २०१४ साली मिस न्यू जर्नी युएसएचा किताब पटकावला आहे. यासोबतच तिने क्लिंट ईस्टवुडलाजर्सी बॉईज चित्रपटात असिस्टंट म्हणून काम केलं आहे.
तसेच स्पिरो रझाटोस आणि कॅप्टन अमेरिका २, फास्ट अँड फ्युरियस ७, रन ऑल नाईट आणि मॉन्स्टर ट्रक्स या सिनेमांसाठी तिने स्टंट डिरेक्टरसोबत सहाय्यक म्हणून काम केलं आहे. आता ती अभय देओलसोबत जंगल क्राय चित्रपटात झळकणार आहे.
तिने एका मुलाखतीत एमिलीने एक अनुभव शेअर केला. ती म्हणाली की,''जंगल क्राय' चित्रपटाच्या एका सीनच्या चित्रीकरणावेळी मला भावूक होऊन खूप रडायचं होतं आणि माझ्यासोबतचा बालकलाकारालाही रडायचं होतं. त्याला ते जमत नव्हते. त्यामुळे तो सीन शूट करण्यासाठी सहा तास लागले. तो पर्यंत माझ्या मी भावना मनात दाबून ठेवल्या. मला माझ्या भावना मनात दाबून ठेवता आल्या कारण ही गोष्ट मी मिस्टर ईस्टवूडकडून शिकले आहे.'
एमिलीला कॅमेऱ्यासमोर येण्यापूर्वी कॅमेऱ्यामागे काम करून सर्व बारकावे शिकायचे होते. जंगल क्राय चित्रपटाचं शूटिंग दोन देशांमध्ये करण्यात आलं आहे.
जंगल क्राय चित्रपट डॉक्टर अच्युत सामंत यांच्या जीवनावर आधारीत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.