The Ellen DeGeneres Show: दीपिका पदुकोणला हवेत विन डिझलसोबत मुले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 16:21 IST2017-01-19T16:21:48+5:302017-01-19T16:21:48+5:30
‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या प्रोमोशनार्थ दीपिका पदुकोण एलेन डिजेनेरसच्या लोकप्रिय ‘द एलेन शो’मध्ये झळकणार आहे. प्रियांका चोप्राला येथेही टक्कर देण्यासाठी ती सज्ज झाली आहे. यावेळी तिने विन डिझेलसोबत मुले होण्याची फँटसी बोलून दाखवली.

The Ellen DeGeneres Show: दीपिका पदुकोणला हवेत विन डिझलसोबत मुले!
ज व्हापासून दीपिका पदुकोण एलेन डिजेनेरसच्या प्रसिद्ध ‘द एलेन शो’वर झळकणार असल्याची बातमी आली आहे तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे तर वेगळे सांगायला नको की, प्रियांका चोप्रा जेव्हा या शोमध्ये आली होती त्या भागाशी तिची तुलना केली जाणार.
‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झेंडर केज’ या हॉलीवूड डेब्यू चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका एलेन डिजेनेरसच्या या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झाली आहे. पांढऱ्या रंगाच्या मायकल कोर्स ड्रेसमधील दीपिकाशी एलेनने अनेक विषयांवर गप्पा मारल्या. सर्वात आधी तर त्यांनी तिचे वडील आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्याविषयी बोलायला सुरुवात केली.
एलेनने तिला वडिलांच्या बॅडमिंटन करिअरविषयी विचारल्यावर दीपिकाने अभिमाने सांगितले की, जेव्हा भारतात कोणीच व्यवसायिक स्तरावर बॅडमिंटन खेळत नसे, त्या काळात माझे वडिल देशासाठी खेळायचे. सर्वच जण डॉक्टर किंवा वकील होण्याच्या मागे लागलेले असताना त्यांनी खेळाडू म्हणून करिअर बनवले.
दीपिकासुद्धा लहानपणी बॅडमिंटन खेळयाचे हे कळाल्यावर एलेन तिला विचारले की, मग वडिलांनी कधी तुला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आग्रह नाही केला?’ यावर ती म्हणाली की, मी जर बॅडमिंटन खेळाडू बनले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता; परंतु त्यांनी मला नेहमीच माझ्या मनाला जे वाटेल ते करण्याचा सल्ला दिला.’
ALSO READ: प्रियांका चोप्राच्या ‘गोल्ड’ स्टाईलला दीपिका पदुकोणने केले आणखी ‘बोल्ड’
‘सोळाव्या वर्षीच मला अभिनेत्री व्हायचे हे मी मनाशी पक्के केले होते. कॅमेऱ्याच्या समोर उभे राहिले की मला खूप खूप आनंद होतो. पोर्टफोलिओ बनवण्यासाठी मी आईक डून दहा रुपये उसने घेतले होते. मी त्यांना विश्वास दिला की, एके दिवशी माझा तुम्हाला अभिमान वाटेल असे काही तरी करून दाखवेल आणि हे दहा हजार रुपयेसुद्धा परत करेन.’
दीपिकाने आतापर्यंत ३० चित्रपटांत काम केले असल्याची जाणीव एलेन तिला करून दिली. म्हणजे दहा हजारांपेक्षा किती तरी जास्त पैसे तु परत केले असणार, असा टोमणाही तिने मारला. विन डिझेलसोबतच्या केमिस्ट्रीविषयी दीपिका विनोदाने म्हणाली की, ‘विनबाबत माझ्या डोक्यात अनेक कल्पना/फँटसी आहेत. आम्ही दोघे एकत्र राहतो, आमचे मुले आहेत असे काही काही स्वप्न मी रंगवत असते.’ आता यावर बिचाऱ्या रणवीर सिंगची काय प्रतिक्रिया असेल?
ALSO READ: द एलेन डिजेनेरस शोवर खुलासा - प्रियांका आणि टॉम हिडलस्टन प्रेमात?

यावेळी तिने ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटात निवड कशी झाली याबद्दलही सांगितले. मेक-अप आर्टिस्ट एलिझाबेथ सॅल्ट्झमन आणि हंग व्हॅनगो यांनी तिचा लूक डिझाईन केला होता. क्रिस्टियन वूडने तिच्या केसांना मोकळे सोडून नैसर्गिक वेव्ह शेप दिला. नुकतेच ती गोल्डन ग्लोब इनस्टाईल आफ्टर पार्टीमध्येसुद्धा सहभागी झाली होती. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा राल्फ लॉरेन गाऊन घातलेला होता.