एल्फा अँग्री यंगमेन लवकरच OTTवर येणार भेटीला, रणबीर-रश्मिकाचा 'अॅनिमल' कधी आणि कुठे होणार प्रदर्शित ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 16:29 IST2023-12-05T16:29:13+5:302023-12-05T16:29:34+5:30
Animal Movie : रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एल्फा अँग्री यंगमेन लवकरच OTTवर येणार भेटीला, रणबीर-रश्मिकाचा 'अॅनिमल' कधी आणि कुठे होणार प्रदर्शित ?
रणबीर कपूर (Ranbir Kapoor)च्या 'अॅनिमल'(Animal Movie)ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक लोक चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 'अॅनिमल'च्या ओटीटी रिलीजबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
'अॅनिमल' ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सकडे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. बॉलिवूड लाइव्हच्या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो. कोणताही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ४५-६० दिवसांनी OTT वर रिलीज होतो. त्यानुसार, 'अॅनिमल' नेटफ्लिक्सवर १४ किंवा १५ जानेवारीपासून प्रसारीत केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'अॅनिमल'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, हा चित्रपट तिकीटबारीवर भरपूर कमाई करत आहे आणि त्यासोबतच तो अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडत आहे. 'अॅनिमल'ने रिलीजच्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर २३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट २५० कोटींचा टप्पा पार करण्यापासून काही पावले दूर आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता हा चित्रपट लवकरच इतिहास रचणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एकीकडे लोक संदीप रेड्डी वांगा यांच्या या चित्रपटाला पसंती दर्शवत आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक या चित्रपटावर टीकाही करत आहेत. चित्रपटात कमालीची हिंसा दाखवण्यात आली आहे, असे काहींचे मत आहे.