इलिनाचे फोटोग्राफरसोबत संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 17:48 IST2016-05-26T12:18:27+5:302016-05-26T17:48:27+5:30
‘रुस्तम’ या चित्रपटाच्या शुटींगसाठी व्यस्त असलेली इलिना डीक्रुझ ही आॅस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ती आपल्या खासगी गोष्टी ...

इलिनाचे फोटोग्राफरसोबत संबंध?
‘ ुस्तम’ या चित्रपटाच्या शुटींगसाठी व्यस्त असलेली इलिना डीक्रुझ ही आॅस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ती आपल्या खासगी गोष्टी सर्वांना सांगत नाही, परंतू अशा गोष्टी सार्वजनिकरित्या सांगण्यास तिचा विरोध आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल तिला काय वाटते? या प्रश्नावर ती म्हणाली, खरोखर नाही! मी अशी व्यक्ती नाही, जी सर्वकाही गोष्टी सांगू इच्छिते. ही माझ्या खासगी आयुष्यातील बाब आहे म्हणून नव्हे तर त्यात आणखी एक व्यक्ती आहे. दुसºया व्यक्तीला ते आवडत नाही म्हणून सांगता येणार नाही. अशा गोष्टींमुळे माझ्यावर खूप टीका होते. पण मी दुसºया व्यक्तीसाठी हे करु शकत नाही. मी कोणत्याही गोष्टी खुलेपणाने बोलत नाही. परंतू मी काही लपवत नाही. दुसºया दारातून लोकांनी यावे ही अपेक्षा करीत नाही. मी या गोष्टी टाळते, असे इलिना म्हणाली.