​एकता कपूरला हवी होती ‘ग्लॅम डॉल’ ! सनी लिओनीने दिला नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 12:11 IST2017-09-25T06:41:51+5:302017-09-25T12:11:51+5:30

एकता कपूरनेच नाही म्हणायला सनी लिओनीला मोठा ब्रेक दिला. ‘जिस्म2’नंतर ‘रागिनी एमएमएस2’मध्ये सनीला ब्रेक मिळाला आणि यानंतर सनीने कधीच ...

Ekta Kapoor wanted 'glam doll'! Sunny Leone refused! | ​एकता कपूरला हवी होती ‘ग्लॅम डॉल’ ! सनी लिओनीने दिला नकार!!

​एकता कपूरला हवी होती ‘ग्लॅम डॉल’ ! सनी लिओनीने दिला नकार!!

ता कपूरनेच नाही म्हणायला सनी लिओनीला मोठा ब्रेक दिला. ‘जिस्म2’नंतर ‘रागिनी एमएमएस2’मध्ये सनीला ब्रेक मिळाला आणि यानंतर सनीने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यामुळे सनीच्या यशामागे एकता कपूरचा मोठा हात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता याची ‘गुरुदक्षिणा’ म्हणून म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा, एकताचा शब्द सनीने मानायलाच हवा. पण सनी हा शब्द मानत नसेल तर त्याला काय म्हणावे? 

नेमके हेच घडलेय. एकता कपूर ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ ही बोल्ड वेबसीरिज घेऊन येतेय, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. करिश्मा शर्मा, रिया सेन आणि सिद्धार्थ गुप्ता हे या वेबसीरिजमध्ये लीडरोलमध्ये आहेत. सध्या या वेबसीरिजचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. एका अशाच प्रमोशनल इव्हेंटमध्ये सनीने काही क्षणांसाठी यावे, अशी एकताची इच्छा होती.  ‘रागिनी एमएमएस2’मध्ये सनी लीड रोलमध्ये होती. त्यामुळे ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सनी आलीच तर या इव्हेंटचे ग्लॅमर आणखी वाढणार होते. तसा शब्द सनीकडे टाकला गेला. पण सनीने म्हणे नकार दिला. होय, यासाठी सनीने डेट्स नसल्याचे कारण पुढे केले. ( कालच संध्याकाळी सनी दोन महिन्यांसाठी लॉस  एंजिल्सला रवाना झाली. याठिकाणी सनी तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे काम बघायचे आहे.) विशेष म्हणजे, सनीने एकताला नकार द्यावा, हे पहिल्यांदा घडले नाही तर याआधी सुद्धा सनीने असाच नकार दिला होता. यापूर्वी एका चित्रपटातील गेस्ट अपिअरन्ससाठी एकताने सनीला विचारले होते. पण त्याहीवेळी सनीने एकताला नम्र नकार कळवला होता. आता पुन्हा एकदा सनीकडून नकारच आला आला आहे. आता सनीकडून असा वारंवार येणारा नकार एकता कसा घेते, हे तिचे तिलाच ठाऊक.

ALSO READ : ​ सनी लिओनीला सर्व सुपरस्टार्सनी दिला नकार! केवळ ‘या’ अभिनेत्याने दिला होकार!!

तूर्तास तरी सनीचा नकार एकताने अतिशय ‘स्पोर्टली’ घेतल्याचे सांगण्यात येतेय. सनीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये सहभागी व्हायला सनीला आवडले असते. पण डेट्स नसल्याने तिचा नाईलाज झाला. एकताला तिने नम्र नकार कळवला आणि एकताने मोठ्या मनाने तिची बाजू समजून घेतली. दोघींमध्येही कुठलाच वाद नाहीय. आता खरे काय, ते लवकर  कळेलच.

Web Title: Ekta Kapoor wanted 'glam doll'! Sunny Leone refused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.