‘अकीरा’चा धमाकेदार ट्रेलर आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 18:58 IST2016-07-04T13:28:42+5:302016-07-04T18:58:42+5:30
अखेर सोनाक्षी सिन्हा मोठ्या ब्रेकनंतर परतली आहे. सोनाक्षीच्या बहुप्रतीक्षित ‘अकीरा’ या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज झाले. यात सोनाक्षीचा अॅक्शन अवतार अगदी धमाकेदारच म्हणावा लागले.
.jpg)
‘अकीरा’चा धमाकेदार ट्रेलर आला...
अ ेर सोनाक्षी सिन्हा मोठ्या ब्रेकनंतर परतली आहे. सोनाक्षीच्या बहुप्रतीक्षित ‘अकीरा’ या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज झाले. यात सोनाक्षीचा अॅक्शन अवतार अगदी धमाकेदारच म्हणावा लागले. ए. आर. मुरुगदास यांचा हा चित्रपट म्हणजे अॅक्शन ड्रामा आहे. साहजिकच सोनाक्षीने यासाठी बराच घाम गाळलाय. चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर याची कल्पना येते. यात सोनाक्षी लीड रोलमध्ये असून कोंकणा सेन शर्मा, उर्मिला मातोंडकर, अमित साध, मिथुन चक्रवर्ती यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट सोनाक्षीला नवीन ओळख मिळवून देईल, यात सध्या तरी शंका नाही. तेव्हा बघा तर सोनाक्षी इन अॅक्शन अवतार!