'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट ह्या दिवशी रिलीज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 14:18 IST2018-07-28T14:12:10+5:302018-07-28T14:18:20+5:30

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनेता अनिल कपूर व अभिनेत्री सोनम कपूर एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 'Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga' film will be released on this day | 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट ह्या दिवशी रिलीज होणार

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट ह्या दिवशी रिलीज होणार

ठळक मुद्दे'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' सिनेमात अभिनेत्री जूही चावला, अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' सिनेमा होणार १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित


 
१९९४ साली विधू विनोद चोप्रा यांचा १९४२ अ लवस्टोरी हा चित्रपट प्रदर्शित केला होता. सामाजिक, राजकीय असंतोषाच्या वातावरणामध्ये खुलणाऱ्या एका प्रेमावर आधारित या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हा चित्रपट नव्या रुपात येणार आहे. या नव्या चित्रपटाची टीझर प्रदर्शित झाला असून त्याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
 
  'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनेता अनिल कपूर व अभिनेत्री सोनम कपूर एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात अभिनेत्री जूही चावला, अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  विधू विनोद चोप्रा यांची बहिण शैली चोप्रा या सिनेमाचे दिग्दर्शन करते आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रथम १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा सोनमने नुकतीच तिच्या ट्विटरवरुन केली आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही तारीख विसरु नका. नक्की पहा’, असे ट्विट सोनमने केले आहे.
 



पुढे अनिल कूपरनेही एक ट्विट करत, ‘ढेर सारा ड्रामा,सिय्याप्पा १ फेब्रुवारी २०१९ रोजी तुमच्या भेटीला येत आहे’, असे लिहिले आहे. 


त्यामुळे १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट १ फेब्रुवारी २०१९ लाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 

 

 

Web Title:  'Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga' film will be released on this day