​रिलीजपूर्वीच ‘2.0’ची रेकॉर्ड कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 13:07 IST2017-03-14T07:37:14+5:302017-03-14T13:07:14+5:30

मेगास्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांचा ‘2.0’ या सिनेमाकडे सिनेप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अर्थात यासाठी आपल्याला ...

Earning a record of '2.0' before release! | ​रिलीजपूर्वीच ‘2.0’ची रेकॉर्ड कमाई!

​रिलीजपूर्वीच ‘2.0’ची रेकॉर्ड कमाई!

गास्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांचा ‘2.0’ या सिनेमाकडे सिनेप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अर्थात यासाठी आपल्याला दिवाळीपर्यंत कळ सोसावी लागणार आहे. येत्या दिवाळी ‘2.0’रिलीज होतो आहे. पण त्याआधी या चित्रपटाने कमाईचा एक विक्रम केला आहे. होय,‘2.0’ रिलीज व्हायला सहा महिन्यांचा अवकाश आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही. तरिही हा चित्रपट आधीच शंभर कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. झी टेलिव्हिजनने या चित्रपटाचे तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेतील सॅटेलाईट राईट्स ११० कोटींना विकत घेतले आहेत.

या चित्रपटाचे एकूण बजेट होते साडेतीनशे कोटी. त्यामुळे त्यातले ११० कोटी आधीच वसूल झाले आहेत. सॅटेलाईट हक्क झी टेलिव्हिजनने 110 कोटींना विकत घेतले आहेत. लायका प्रॉडक्शन्सचे क्रिएटिव्ह हेड राजू महालिंगम यांनी ही माहिती दिली आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससोबत डिजीटल राईट्ससाठी चर्चा सुरु आहे. खरे तर सॅटेलाईट हक्क कायमस्वरुपी विकले जातात. ११० कोटी इतकी मोठी रक्कम मोजून केवळ पंधरा वर्षांसाठीच सिनेमाचे हक्क विकण्यात आले आहेत. सिनेमाचे थिएटरिकल हक्क अद्याप विकलेले नाहीत. फक्त हिंदी भाषेतील हक्कच शंभर कोटींना विकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय चिनी आणि जपानी भाषेतील हक्क वेगळे विकले जाणार आहेत.

सध्या ‘2.0’च्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम अंतिम टप्प्यात आहे.  २०१० मध्ये आलेल्या ‘रोबोट’ या सिनेमाचा हा सीक्वल असून,‘2.0’मध्ये रजनीकांत एका वैज्ञानिकाच्या आणि रोबोटच्या दुहेरी भूमिकेत बघावयास मिळणार आहे. रजनीकांत व्यतिरिक्त अक्षयकुमारही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, तो यात खलनायक साकारत आहे. त्याचबरोबर एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसेन यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

Web Title: Earning a record of '2.0' before release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.