'हम आपके है कौन'च्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल, सलमान, माधुरीसोबत दिसले लक्ष्मीकांत बेर्डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:02 IST2024-09-26T12:59:35+5:302024-09-26T13:02:13+5:30
Hum Aapke Hain Kaun : सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा सुपरहिट चित्रपट 'हम आपके है कौन'च्या शूटिंगचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

'हम आपके है कौन'च्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल, सलमान, माधुरीसोबत दिसले लक्ष्मीकांत बेर्डे
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित फॅमिली ड्रामा चित्रपट 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hain Kaun) या चित्रपटाला ३० वर्षे झाली, पण चित्रपटातील प्रत्येक दृश्य आणि त्यातील अप्रतिम गाणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. जेव्हा जेव्हा फॅमिली ड्रामा चित्रपटाची चर्चा होते, तेव्हा सलमान खान आणि माधुरी दीक्षितच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाचे नाव यादीत सर्वात वर येते. आता 'हम आपके है कौन' शी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) डान्स सीन शूट करताना दिसत आहेत. या सीनमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेदेखील दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित नाचत आहेत, कधी एकमेकांकडे पाहत आहेत, तर कधी हात धरून आहेत. हा सीन दोन शॉट्समध्ये होताना दिसत आहे, हा सीन संपताच माधुरी हात काढून बाजूला होते. यानंतर सलमान खान त्याच स्टेपमध्ये पुतळ्यासारखा उभा राहतो आणि त्यानंतर चित्रपटात नोकराच्या भूमिकेत दिसणारा लल्लू (लक्ष्मीकांत बेर्डे) सलमानच्या हातात हात ठेवतो आणि जेव्हा सलमान शुद्धीवर येतो तेव्हा त्याला धक्का बसतो.
व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणताहेत...
आता या व्हायरल व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या व्हिडिओवर एका युजरने विचारले की, 'माधुरीला शेवटी राग का आला?', तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'मी पुन्हा चित्रपट पाहणार आहे'. आणखी एकाने लिहिले, 'तो एका सीनसाठी खूप मेहनत करतो'. सलमानच्या एका चाहत्याने लिहिले आहे, 'भाई, किती टफ आहे'. 'हम आपके है कौन' हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९५ रोजी प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत बनवला गेला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या होते.