'शोले'च्या शूटिंगदरम्यान जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती 'ही' गुड न्यूज!, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 07:00 IST2021-12-25T07:00:00+5:302021-12-25T07:00:00+5:30

शोले (Sholey) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे लग्न झाले.

During the shoot, 'this' Actress became pregnant with Amitabh Bachchan | 'शोले'च्या शूटिंगदरम्यान जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती 'ही' गुड न्यूज!, जाणून घ्या याबद्दल

'शोले'च्या शूटिंगदरम्यान जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती 'ही' गुड न्यूज!, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'शोले...' (Sholey)  जय-वीरू, गब्बरपासून ते धन्नो आणि कालियापर्यंत, चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या मनात घर करून कायम आहे. चित्रपटातील डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. पण शोले चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जया बच्चन यांनी बिग बींना खूशखबर दिली होती.

शोले चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका साकारली होती. तर त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनीही सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या चुकीमुळे जया प्रेग्नेंट राहिल्या होत्या, हे फार कमी लोकांना माहीत असेल.

गरोदर असतानाही जया बच्चन यांनी शूटिंग केले पूर्ण

एक काळ असा होता की अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रिलेशनशीपचे किस्से ऐकायला मिळत होते पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. यादरम्यान जया आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी १९७३ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शोले सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न झाले. यादरम्यान जया गरोदर राहिल्या. मात्र जया बच्चन गरोदर असूनही त्यांनी  शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी मुलगी श्वेता यांना जन्म दिला.

Web Title: During the shoot, 'this' Actress became pregnant with Amitabh Bachchan