'डंकी'ची ख्रिस गेललाही भुरळ, 'लुट पुट गया' गाण्यावर भन्नाट डान्स; किंग खान म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:38 IST2023-12-15T11:38:07+5:302023-12-15T11:38:36+5:30

Universe Bossचा 'लुट पुट गया' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून शाहरुख खानही अवाक्

dunky movie craze cricketer chris gayle dance on lutt putt gaya song shah rukh khan reacted on video | 'डंकी'ची ख्रिस गेललाही भुरळ, 'लुट पुट गया' गाण्यावर भन्नाट डान्स; किंग खान म्हणाला...

'डंकी'ची ख्रिस गेललाही भुरळ, 'लुट पुट गया' गाण्यावर भन्नाट डान्स; किंग खान म्हणाला...

बॉलिवूडचा किंग खान त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'डंकी'च्या ट्रेलरनंतर या सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. 'डंकी'मधील 'लुट पुट गया' गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या गाण्यावरचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. आता या गाण्याची भुरळ वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेललाही पडली आहे. 

शाहरुखच्या 'डंकी' सिनेमातील 'लुट पुट गया' गाण्यावर ख्रिस गेलने डान्स केला आहे. शाहरुखच्या फॅन पेजवरुन त्याचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ख्रिस गेल लुट पुट गया गाण्याच्या हूक स्टेप करताना दिसत आहे. युनिव्हर्स बॉसचा किंग खानच्या गाण्यावरील डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. ख्रिस गेलचा डान्स पाहून शाहरुखही अवाक झाला आहे. 

किंग खानने ख्रिस गेलचा व्हिडिओ त्याच्या एक्सवरुन रिट्वीट केला आहे. "आणि युनिव्हर्स बॉसने त्याच्या पद्धतीने हेदेखील हिट केलं आहे...माझ्या मित्रा थँक्यू. आपण लवकरच भेटू आणि लुट पुट गया गाण्यावर एकत्र डान्स करू," असं शाहरुखने म्हटलं आहे. 

दरम्यान, शाहरुखच्या 'डंकी' सिनेमात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात शाहरुख हार्डी हे पात्र साकारताना दिसणार आहे. २२ डिसेंबरला 'डंकी' सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान बुकिंगलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: dunky movie craze cricketer chris gayle dance on lutt putt gaya song shah rukh khan reacted on video