बॉलीवुडचा हॅन्डसम हंक ऋतिक रोशन सध्या त्याच्या बालपणीच्या आठवणीत रमला आहे. आता आपला डुग्गु ...
डुग्गुच्या चाईल्ड मेमरीज
/> बॉलीवुडचा हॅन्डसम हंक ऋतिक रोशन सध्या त्याच्या बालपणीच्या आठवणीत रमला आहे. आता आपला डुग्गु रोशन परिवारातला असल्याने त्याचे बालपण देखील स्टार्सच्या झगमगाटातच गेले आसणार यात काही शंका नाही. आता पहा ना बॉलीवुडचा शहंशहा अमिताभ बच्चन यांचे चाहते तर जगभरात आहेतच पण आपला डुग्गु बालपणापासुनच अमितजींचा चाहता आहे. त्याने नूकताच सोशलसाईट्सवर अमिताभ बच्चन यांच्या सांबतचा एक जुना फोटो अपलोड केला आहे. यामध्ये ऋतिक जवळपास दहा -बारा वर्षांचा असेल तर व्हाईट कलरच्या टिशर्ट अन ग्रे रंगाच्या पॅन्टमध्ये आपला हा हॅन्डसम बॉय अतिशय क्युट दिसत होता. अमिताभजींच्या शेजारी बसुन क्लिक केलेला हा फोटो ऋतिकसाठी खुपच स्पेशल आहे. तो म्हणतोय, माय फॅन मोमेंट अॅज अ किड असे म्हणुन तो थांबत नाही तर सांगतोय कि प्रत्येक अॅक्टरमध्येच थोडेफार का होईना अमितजी असतातच अन तुम्ही अॅग्री आहात का असे देखील विचारतोय. आता डुग्गुच्या या चाईल्ड मेमेरीजला त्याच्या फॅन्सकडुन लाईक्स मिळत आहेत हे मात्र खरे.