संजय दत्तच्या ‘या’ कृत्यामुळे सुनील दत्त यांचा झाला होता भयंकर संताप; जोड्याने केली होती धुलाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:52 IST2018-06-05T09:41:29+5:302018-06-05T15:52:36+5:30

६ जून १९२९ मध्ये जन्मलेले दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज दत्त असे होते. सुनील दत्त यांचे ...

Due to Sanjay Dutt 's' action, Sunil Dutt was furious; Washing was done by the pair! | संजय दत्तच्या ‘या’ कृत्यामुळे सुनील दत्त यांचा झाला होता भयंकर संताप; जोड्याने केली होती धुलाई!

संजय दत्तच्या ‘या’ कृत्यामुळे सुनील दत्त यांचा झाला होता भयंकर संताप; जोड्याने केली होती धुलाई!

जून १९२९ मध्ये जन्मलेले दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज दत्त असे होते. सुनील दत्त यांचे बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान होते. परंतु मुलगा संजय दत्तमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला काहीसा धोका निर्माण झाला होता. जेव्हा संजय दत्त नशेच्या अधीन गेला आणि पुढे त्याचे नाव १९९३ च्या बॉम्बस्फोटात आले तेव्हा सुनील दत्त प्रचंड तणावात होते. त्यावेळी हेदेखील म्हटले जात होते की, सुनील दत्त मुलगा संजयला वाचविण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर तासन्तास बसून राहायचे. 

एका मुलाखतीत संजय दत्तने सांगितले होते की, जेव्हा मी लपून बाथरूममध्ये सिगारेट ओढत होतो तेव्हा अचानकच त्याठिकाणी वडील सुनील दत्त आले. मला अशा स्थितीत बघून त्यांचा प्रचंड संताप झाला होता, त्यांनी जोड्याने माझी धुलाई केली होती. संजय दत्तला नशेची इतकी सवय लागली होती की, नशेमुळे त्याच्या हातून अनेक बडे प्रोजेक्ट गेले होते. अभिनेते जॅकी श्रॉफच्या पहिल्या ‘हीरो’ या चित्रपटासाठी अगोदर संजय दत्तचे नाव निश्चित करण्यात आले होते, परंतु संजयच्या ड्रग्सच्या व्यसनामुळे सुभाष घई यांनी त्याला चित्रपटात न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या चित्रपटासाठी जॅकीदाचा विचार करण्यात आला. 



दरम्यान, ‘रॉकी’ चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच संजय दत्तला ड्रग्सचे व्यसन लागले होते. एकेदिवशी संजय दत्त ड्रग्सचे सेवन करून झोपला ते भूख लागल्यावरच उठला होता. जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या शेजारी असलेला नोकर जोरजोरात रडू लागला. संजूबाबाने त्याला विचारले, का रडतोस? त्यावर नोकराने म्हटले की, ‘तुम्ही दोन दिवसांनंतर झोपेतून उठले आहात.’ 

दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा सुनील दत्त आणि संजय दत्त यांनी  स्क्रीन शेअर केली होती. वास्तविक ‘क्षत्रिय’ आणि ‘रॉकी’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते, परंतु त्याच्यात त्यांचा एकही सीन नव्हता. 

Web Title: Due to Sanjay Dutt 's' action, Sunil Dutt was furious; Washing was done by the pair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.