आमीरला पाहून सुखावले दिलीप कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 22:14 IST2016-04-20T16:44:57+5:302016-04-20T22:14:57+5:30
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सध्या रूग्णालयात आहे. उद्या गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयानुरूप त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. ...

आमीरला पाहून सुखावले दिलीप कुमार
ब लिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सध्या रूग्णालयात आहे. उद्या गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयानुरूप त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. गेल्या १५ एप्रिलला दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या कारणावरून रूग्णालयात भरती करण्यात आले होते. पण आता दिलीप कुमारांच्या प्रकृती बरीच सुधारणा आहे. भेटायला येणाºयांना ते प्रतिसाद देत आहेत. आज अभिनेता आमीर खान दिलीप कुमार यांच्या भेटीला रूग्णालयात पोहोचला. आमीरला पाहून दिलीप कुमार यांना अतिशय आनंद झाला. आपल्या सोशल नेटवर्कींग साईटवर म्हणूनच त्यांनी आमीर व त्यांचा एक फोटोही शेअर केला. अल्लाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांनी मला बरे केले आहे. आमीर माझ्यासोबत वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद..असा मॅसेजही त्यांनी या फोटोखाली लिहिला आहे. दिलीप साहेब, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, आमच्याही याच शुभेच्छा!
Allah's mercy and blessings on all for keeping me in your duas. Thank you @aamir_khan for spending time.