ऋषी कपूरचे वय वाढल्याने संजय दत्तकडे आकर्षित झाली होती रविना टंडन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 18:36 IST2017-10-01T12:58:19+5:302017-10-01T18:36:22+5:30

अभिनेत्री रविना टंडन आणि संजय दत्त या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘विजेता, आतिश, जीना मरना तेरे संग, क्षत्रिय ...

Due to the age of Rishi Kapoor, Sanjay Dutt was attracted to Ravi Tandon! | ऋषी कपूरचे वय वाढल्याने संजय दत्तकडे आकर्षित झाली होती रविना टंडन!

ऋषी कपूरचे वय वाढल्याने संजय दत्तकडे आकर्षित झाली होती रविना टंडन!

िनेत्री रविना टंडन आणि संजय दत्त या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘विजेता, आतिश, जीना मरना तेरे संग, क्षत्रिय आणि जमाने से क्या डरना’ या चित्रपटांमध्ये या दोघांची जोडी खूप पसंत करण्यात आली. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, जेव्हा रविना ‘जमाने से क्या डरना’ या चित्रपटात काम करीत होती, तेव्हा तिला विश्वासच बसत नव्हता की, ती संजय दत्तबरोबर चित्रपट करीत आहे. वास्तविक रविना सुरुवातीपासूनच संजयची मोठी चाहती राहिली आहे. १९९४ मध्ये जेव्हा तिला ‘जमाने से क्या डरना’ या चित्रपटात संजयसोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा तिला विश्वासच बसत नव्हता की, ती तिच्या फेव्हरेट स्टारसोबत काम करीत आहे. 

रविनाने तिच्या एका मुलाखतीत सांगिंतले होते की, ‘लहानपणापासूनच मला ऋषी कपूर पसंत होते. त्यामुळे मी त्यांचे प्रत्येक चित्रपट बघत असे. मात्र त्यांचे वय वाढल्यामुळे मी संजूबाबाकडे आकर्षित झाली.’ त्याकाळी रविनाने तिच्या रूममध्ये चहूबाजूने संजूबाबाचे पोस्टर लावले होते. रविनाने आणखी एक किस्सा सांगताना म्हटले होते की, ‘क्षत्रिय’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा मी हॉर्स रायडिंग करीत होते, तेव्हा मला घोड्याने खाली फेकले होते. त्यामुळे माझा हात फॅक्चर झाला होता. शिवाय कानाजवळून रक्तही निघत होते. काही काळानंतर मी बेशुद्ध पडली. शूटिंग जंगलात केली जात असल्याने दूरपर्यंत रुग्णालय नव्हते. अशात संजूबाबाने दोन्ही हातात उचलून मला रुग्णालयापर्यंत नेले होते. 



खरं तर रविनाच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले; परंतु ती संजूबाबाच्या प्रेमात वेडी झाली होती. तिने सांगितले की, जेव्हा मी संजूबाबासोबत काम करीत असे, तेव्हा मनात एक भीती कायम असायची, ती म्हणजे माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना? पण काहीही असो, त्याकाळी या जोडीने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. पडद्यावरील यशस्वी जोड्यांपैकी एक जोडी म्हणून संजूबाबा आणि रविनाकडे बघितले जाते. 

Web Title: Due to the age of Rishi Kapoor, Sanjay Dutt was attracted to Ravi Tandon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.