ड्रग चॅट केस: एनसीबी अधिकाऱ्यांचा खुलासा, गायब आहे दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश

By अमित इंगोले | Updated: November 2, 2020 14:33 IST2020-11-02T14:32:13+5:302020-11-02T14:33:17+5:30

नुकताच एनसीबी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. पण आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की, करिश्मा कुठे आहे याचा काहीच पत्ता नाही.

Drug Chat Case : Deepika Padukone manager Karishma Prakash untraceable says NCB official | ड्रग चॅट केस: एनसीबी अधिकाऱ्यांचा खुलासा, गायब आहे दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश

ड्रग चॅट केस: एनसीबी अधिकाऱ्यांचा खुलासा, गायब आहे दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश

सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग्स प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो करत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबीलला अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यातील काही संदिग्ध चॅट सापडले होते. त्यानंतर दीपिका आणि करिश्माची चौकशी करण्यात आली होती. नुकताच एनसीबी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. पण आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की, करिश्मा कुठे आहे याचा काहीच पत्ता नाही.

एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे खरंय की, करिश्मा प्रकाशचा काहीच पत्ता लागत नाहीय. अधिकाऱ्यांचा करिश्मासोबत काहीच संपर्क होऊ शकत नाहीये आणि ती समन्स पाठवल्यावरही चौकशीसाठी हजर राहिली नाही. करिश्माला २७ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान एनसीबीला तपासादरम्यान करिश्माच्या घरी १.७ ग्रॅम चरस आणि सीबीडी ऑइलच्या काही बॉटल सापडल्या होत्या.

याआधी करिश्माने शनिवारी जामीनासाठी मुंबईच्या विशेष कोर्टात अर्ज केला होता. ड्रग चॅट प्रकरणात एनसीबीने दीपिका पादुकोणसोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंहची चौकशी केली होती. पण त्यानंतर पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी एनसीबीने हेही स्पष्ट केलं होतं की, त्यांनी कुणालाही क्लीन चीट दिलेली नाही.
 

Web Title: Drug Chat Case : Deepika Padukone manager Karishma Prakash untraceable says NCB official