दबंग 3मधून सोनाक्षीला डच्चू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 13:26 IST2016-07-07T07:54:18+5:302016-07-07T13:26:37+5:30
दबंग या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील सोनाक्षी प्रेक्षकांना प्रचंडच आवडली होती. या चित्रपटाच्या यशामुळे ...
.jpg)
दबंग 3मधून सोनाक्षीला डच्चू?
द ंग या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील सोनाक्षी प्रेक्षकांना प्रचंडच आवडली होती. या चित्रपटाच्या यशामुळे तिला बॉलिवुडमध्ये खूप चांगल्या भूमिका ऑफर झाल्या. सोनाक्षी सलमानसोबत दबंग 2मध्येही झळकली होती. पण आता दबंग 3मधून सोनाक्षीचा पत्ता कट झाला असल्याचे म्हटले जात आहे. सलमान सोनाक्षीवर चिडला असल्याने ती या चित्रपटाचा भाग नसणार असल्याची चर्चा आहे. सलमानचा भाऊ अरबाज खानच्या डॉली की डोली या चित्रपटात सोनाक्षीने काम करण्यास नकार दिल्यामुळे सलमान तिच्यासोबत काम करायला उत्सुक नसल्याचे म्हटले जात आहे. दबंग 3मध्ये प्रेक्षकांना चुलबुल पांडे पोलिस कसा झाला हा प्रवास पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. चुलबुल पांडे पोलिस झाल्यानंतर रज्जो त्याच्या आयुष्यात आल्याची आपण दबंगमध्ये पाहिले होते. त्यामुळे दबंग 3मध्ये रज्जोची व्यक्तिरेखा असण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता दबंग 3मध्ये चुलबुल पांडेच्या आयुष्यात प्रेक्षकांना रज्जोलाच पाहायला मिळतेय की नाही, रज्जोची भूमिका सोनाक्षीच साकारते की नाही याची उत्तरे आपल्या पुढील काळातच मिळतील.