Drishyam : अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! 'दृश्यम ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:05 IST2022-11-22T11:05:03+5:302022-11-22T11:05:31+5:30

Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम २' ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाची लोकांमध्ये असलेली क्रेझ पाहता आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

Drishyam : Good news for Ajay Devgn fans...! A big update has come out regarding 'Drishyam 3' | Drishyam : अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! 'दृश्यम ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

Drishyam : अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! 'दृश्यम ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

अजय देवगण(Ajay Devgn)चा सस्पेन्स-क्राइम ड्रामा चित्रपट 'दृश्यम २' (Drishyam 2) बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडत आहे. १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसांपासूनच खूप पसंती मिळते आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना आणि श्रिया सरन यांसारख्या स्टार्सनी सजलेला 'दृश्यम २' हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. चित्रपटाची सस्पेन्स थ्रिलर कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. पहिल्या भागानंतर सात वर्षांनी प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम २' या चित्रपटातही विजय साळगावकर म्हणजेच अजयचा सस्पेन्स कायम आहे. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. यावेळी चित्रपटात दाखवण्यात आलेला सस्पेन्स टॉप सीक्रेट ठेवण्याची योजना आखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


इतकंच नाही तर चित्रपटाची कथा कोणत्याही प्रकारे लीक होण्यापासून वाचवण्यासाठी यावेळी मल्याळम सुपरस्टार मोहनलालच्या 'दृश्यम ३' या चित्रपटासोबत अजय देवगणच्या चित्रपटाची हिंदी आवृत्तीही प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.


दृश्यम फ्रँचायझीच्या शेवटच्या दोन भागांमध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली आहे, ज्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या तिसर्‍या भागात अजय देवगणशिवाय इतर कोणाचीही उपस्थिती प्रेक्षकांना आवडणार नाही हे उघड आहे. दृश्यमचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते आणि दुसरा भाग दिग्दर्शक कुमार मंगत यांचा मुलगा अभिषेक पाठक याने दिग्दर्शित केला आहे. 

Web Title: Drishyam : Good news for Ajay Devgn fans...! A big update has come out regarding 'Drishyam 3'