'दृश्यम ३'मध्ये जयदीप अहलावतने अक्षय खन्नाला केलं रिप्लेस? दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:08 IST2025-12-29T17:07:25+5:302025-12-29T17:08:12+5:30
'दृश्यम ३'मध्ये जयदीप अहलावत दिसणार नाही? मग..., दिग्दर्शक अभिषेक पाठकने केला खुलासा

'दृश्यम ३'मध्ये जयदीप अहलावतने अक्षय खन्नाला केलं रिप्लेस? दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाला...
प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा २०१५ साली आलेला 'दृश्यम' सिनेमा आजही हिट आहे. या सिनेमाचा वेगळा चाहतावर्ग आहे. अभिनेता अजय देवगणला या सिनेमाने वेगळी ओळख दिली. 'दृश्यम' मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. २०२२ साली 'दृश्यम २'आला ज्यामध्ये अक्षय खन्नाही होता. तर आता 'दृश्यम ३'ची चर्चा आहे. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. मात्र या तिसऱ्या भागातून अक्षय खन्ना काही कारणाने बाहेर पडला आहे. त्याच्या जागी जयदीप अहलावतला घेण्यात आल्याची चर्चा होती. आता यावर दिग्दर्शक अभिषेक पाठकने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक पाठक म्हणाला, "नाही, जयदीप अहलावत अक्षय खन्नाला रिप्लेस करणार नाही. मी स्क्रिप्टमध्ये काही बदल करत आहे आणि अक्षय खन्नाच्या भूमिकेच्या जागी मी एक नवीन भूमिका लिहित आहे."
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
याचा अर्थ 'दृश्यम ३'मध्ये अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत दिसण्याच्या सर्व चर्चा अभिषेक पाठकने फेटाळून लावल्या आहेत. तसंच अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडण्यामागचं खरं कारणही समोर आलं आहे. अक्षयला सिनेमात विग घालायचा होता मात्र 'दृश्यम २'मध्ये अक्षयच्या डोक्यावर विग नव्हता. आता तिसऱ्या भागातही विग नको असं अभिषेक पाठकचं म्हणणं होतं. यावर अक्षय खन्नाने सहमती दर्शवली नाही आणि त्याने सिनेमाच सोडला.
अक्षय खन्ना सध्या यशाच्या शिखरावर आहे. 'छावा' आणि आता 'धुरंधर'मुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. 'छावा'आधी तो 'दृश्यम २'मध्येही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. मात्र आता 'दृश्यम ३'मध्ये तो दिसणार नसल्याने चाहते काहीसे निराश झाले आहेत.