Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 15:23 IST2022-10-17T15:22:17+5:302022-10-17T15:23:48+5:30

बहुप्रतिक्षित 'दृश्यम 2' चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर रिलीज झाला आहे. यात अजय देवगणसमोर अक्षय खन्नाचे आव्हान असणार आहे.

Drishyam 2 Trailer: Salgaonkar Family Facing the same past after seven years; Thrilling trailer of 'Drishyam 2' releases | Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

Drishyam 2 Trailer Out: बहुप्रतिक्षित 'दृश्यम 2' चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर रिलीज झाला आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत परतला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अजयचा सामना तब्बूसहअक्षय खन्नासोबत होणार आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होत असून, यात सात वर्षांनंतर साळगावकर कुटुंबासमोर 'तो' भूतकाळात येणार आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच अजय देवगण म्हणजेच ​​विजय साळगावकरचा आवाज येतो. "सत्य झाडासारखं असतं, तुम्हाला पाहिजे तितकं गाडून टाका, ते एक ना एक दिवस बाहेर येणारच." दुसऱ्याच क्षणी सात वर्षानंतरचा विजय दिसतो. तो पोलिसांना सांगतो की, सात वर्षे झाली, पण आजही त्याच्या कुटुंबाचा छळ होत आहे. 

पाहा ट्रेलर:-

काही क्षणानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अक्षय खन्नाची एन्ट्री होते. तो त्याच्या पद्धतीने सात वर्षांपूर्वीची केस तपासण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तब्बूचीही एन्ट्री होते. यावेळी ती पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर आई म्हणून या प्रकरणात सामील आहे. ट्रेलरच्या शेवटी विजय कबुलीजबाब देताना दिसत आहे. 

पहिल्या भागात ज्यांनी-ज्यांनी भूमिका साकारल्या, ते सर्वजण यात दिसत आहेत. ट्रेलर पाहताना तुमच्या मनात एकच प्रश्न येईल की, अजयने कबुलीजबाब का दिला आणि यावेळी साळगावकर कुटुंबीय पोलिसांच्या तावडीत अडकणार का? की मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही विजय पोलिसांना चकमा देईल? अखेर काय होणार, हे नोव्हेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

Web Title: Drishyam 2 Trailer: Salgaonkar Family Facing the same past after seven years; Thrilling trailer of 'Drishyam 2' releases