Drishyam 2 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ची छप्परफाड कमाई, तिसऱ्या शुक्रवारी ही केली जबरदस्त कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 06:36 PM2022-12-03T18:36:51+5:302022-12-03T18:42:01+5:30

Drishyam 2 Box Office Report: अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय. तिसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा जबरदस्त गर्दी खेचतोय.

Drishyam 2 day 15 box office collection Ajay Devgn Tabu akshaye khanna | Drishyam 2 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ची छप्परफाड कमाई, तिसऱ्या शुक्रवारी ही केली जबरदस्त कमाई

Drishyam 2 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ची छप्परफाड कमाई, तिसऱ्या शुक्रवारी ही केली जबरदस्त कमाई

googlenewsNext

 Drishyam 2 Box Office Collection day 15:अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करतोय. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 'दृश्यम 2' ला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि दोन आठवड्यांनंतरही 'दृश्यम 2' चा फिव्हर कायम आहे. तिसऱ्या शुक्रवारीही या चित्रपटाने 4 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.


'दृश्यम 2' रिलीज होऊन 15 दिवस उलटले तरी प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर अभिषेक पाठकच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.38 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाने दुस-या दिवशी २१.५९ कोटी तर 'दृश्यम २' ने तिसर्‍या दिवशी २७.१७ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी चित्रपटाने 11.87 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 10.48 कोटींची कमाई केली, तर सहाव्या दिवशी 9.55 कोटी रुपये, सातव्या दिवशी 8.62 कोटी रुपये आणि आठव्या दिवशी 7.87 कोटी रुपयांची कमाई केली.

'दृश्यम 2' ने नवव्या दिवशी 14.05 कोटींची कमाई केली आणि दहाव्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 17.32 कोटी रुपये झाले. चित्रपटाने 11 व्या दिवशी 5.44 कोटी रुपये कमावले, तर 12 व्या दिवशी 5.15 कोटी रुपये आणि 13 व्या दिवशी 4.68 कोटी रुपये कमावले. आता 14व्या दिवशी चित्रपटाने 4.31 कोटींची कमाई केली आहे, तर तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 15व्या दिवशी 'दृश्यम 2' ने 4.45 कोटींचा व्यवसाय केला आहे. 15 व्या दिवसानंतर 167.92 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे.

Web Title: Drishyam 2 day 15 box office collection Ajay Devgn Tabu akshaye khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.