ड्रामा क्विन राखीने होळीच्या दिवशी घेतली भांग, मग झाले असे काही़...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 12:08 IST2017-03-13T06:38:36+5:302017-03-13T12:08:36+5:30

ड्रामा क्विन राखी सावंत होळीला धम्माल मस्ती करते. राखीला होळी खेळायला प्रचंड आवडतं. लहानपणापासून ती होळी खेळत आलीय आणि ...

Drama quinn rake on the day of Holi and become a cannabis ... | ड्रामा क्विन राखीने होळीच्या दिवशी घेतली भांग, मग झाले असे काही़...

ड्रामा क्विन राखीने होळीच्या दिवशी घेतली भांग, मग झाले असे काही़...

रामा क्विन राखी सावंत होळीला धम्माल मस्ती करते. राखीला होळी खेळायला प्रचंड आवडतं. लहानपणापासून ती होळी खेळत आलीय आणि आत्ताही दरवर्षी राखी होळी खेळतेच खेळते. होळीशी संबंधित राखीच्या अनेक आठवणी आहेत. आज होळीच्या मुहूर्तावर राखीने या आठवणी शेअर केल्या. ती सांगते, कॉलेजला असताना पैसे नव्हते. त्यामुळे होळी खेळलीच नाही. त्यामुळे ती होळी आठवत नाही. पण फिल्म इंडस्ट्रीत मी अगदी आठवणीत राहील अशी होळी खेळलीय. यंदाची होळी मी भांग पिऊन साजरी करणार आहे. भांग घेतली की, मी जय जय शिव शंकर करायला लागते़ बम बम भोले माझ्या मेंदूचा ताबा घेतात. मग मी काय करतेय काय नाही, मला काहीही कळत नाही.
याबाबतचा एक किस्साही राखीने शेअर केला. होय, एकदा राखीने होळीच्या दिवशी पोटात मस्तपैकी भांग रिचवली आणि मग काय तिचे बम बम भोले झाले. भांगेची नशा अशी काही चढली की, त्यात राखीने एक नाही दोन नाही तर पूर्ण २५ समोसे खाल्लेत. नशा उतरल्याबरोबगर मात्र राखीला दिवसा तारे दिसायला लागले. वजन वाढणार, या भीतीने तिचा थरकाप उडाला. मग काय, त्यानंतर कितीतरी दिवस राखीला सलाद खावून काढावे लागलेत. हा किस्सा सांगताना राखीला हसू आवरेना, हे सांगणे नकोच...
राखी सांगते, भांग घेतल्यानंतर आम्ही दिवसभर नुसते हसत सुटायचो. सगळीकडे होळी साजरी करत धम्माल मज्जा करायचो. लहानपणी आम्ही चाळीत राहायचो. आजूबाजूची मुलं माझ्यावर रंगांचे फुगे फेकायचे. माझ्याकडे फुगे घ्यायला पैसे नव्हते. मग काय कंडोममध्ये पाणी भरून मी त्यानेच बदला घ्यायची.

Web Title: Drama quinn rake on the day of Holi and become a cannabis ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.