​डॉ. गुलाटीला विसरा! आता सुनील ग्रोव्हर बनलाय ‘बिल्ला शराबी’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:18 IST2017-09-25T08:48:41+5:302017-09-25T14:18:41+5:30

कपिलच्या शोमधून बाहेर पडल्यावर सुनील ग्रोव्हरकुठल्या नवीन भूमिकेत येतो, याचीच प्रतीक्षा आहे आणि कदाचित ही प्रतीक्षा संपलीय.

Dr. Forget the Gulati! Sunil Grover is now 'Badla Sharaabi' !! | ​डॉ. गुलाटीला विसरा! आता सुनील ग्रोव्हर बनलाय ‘बिल्ला शराबी’!!

​डॉ. गुलाटीला विसरा! आता सुनील ग्रोव्हर बनलाय ‘बिल्ला शराबी’!!

नील ग्रोव्हरला सध्या त्याचे चाहते प्रचंड ‘मिस’ करताहेत. कपिल शर्माच्या शोमधून सुनील ग्रोव्हर बाहेर पडला आणि या शोचा जणू ‘चार्म’चं हरवला. खरे तर, खळखळून हसवणा-या इंडियन कॉमेडीयन्सची नावे घ्यायची झाल्यास सुनील ग्रोव्हरचे नाव सर्वात वर येते. त्याचा गंभीर चेहराही हसायला भाग पाडतो. रिंकू भाभी, गुत्थी आणि डॉक्टर गुलाटीसारख्या अनेक भूमिकांमध्ये सुनीलने जीव ओतला. त्यामुळे कपिलच्या शोमधून बाहेर पडल्यावर सुनील कुठल्या नवीन भूमिकेत येतो, याचीच प्रतीक्षा आहे आणि कदाचित ही प्रतीक्षा संपलीय. 
होय, आता सुनील एका नव्या रूपात आपल्यासमोर येणार आहे. ते म्हणजे, ‘बिल्ला शराबी’ बनून. तेही सुप्रसिद्ध दिग्दर्शक अमित त्रिवेदी याच्यासोबत मिळून. सुनीलने त्याच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्ले करताच त्यातून एक सस्पेंस आवाज ऐकायला येतो. पाण्यातून जाणारे कुणाचे तरी पाय...मग हळूहळू एका व्यक्तिची पाठमोरी आकृती ...काही क्षणांत ही व्यक्ति पलटून आपल्याकडे बघते आणि मग अचानक आपल्या चेहºयावर हसू फुटते. ‘बिल्ला शराबी के गाने का प्रोमो’ असे या व्हिडिओवर लिहिलेले आहे.  २६ सप्टेंबरला म्हणजे उद्या हा प्रोमो रिलीज होत आहे. याला सुनीलने आवाज दिला पण संगीत अमित त्रिवेदीचे आहे.




ALSO READ : OMG !! ​वरूण धवनसोबत काय करतोय सुनील ग्रोव्हर?

यापूर्वी सुनीलचा असाच एक व्हिडिओ आला होता. ‘मेरे हसबण्ड मुझे प्यार नहीं करते’ या नावाने आलेल्या या व्हिडिओने लोकांना चांगलेच हसवले होते. आता सुनीलच्या अशाच ‘बिल्ला शराबी’ या व्हिडिओची प्रतीक्षा आहे. आता या व्हिडिओत नेमके सुनीलचे काय रूप दिसणार हे तर उद्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजू शकेल. अर्थात तोपर्यंत  प्रतीक्षा ही आलीच...
‘ द कपिल शर्मा शो’मध्ये सुनीलने साकारलेली डॉ. गुलाटी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतली होती. पण सुनील आणि कपिलच्या झालेल्या भांडणानंतर त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्यानंतर सोनी वाहिनीच्या काही कार्यक्रमामध्ये सुनीलने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.  

Web Title: Dr. Forget the Gulati! Sunil Grover is now 'Badla Sharaabi' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.