बॉलिवूड स्टारर्स ‘ट्विटर’पासून दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 00:47 IST2016-02-20T07:46:20+5:302016-02-20T00:47:53+5:30
अनेक सेलिब्रेटी, खेळाडू, राजकीय नेते आदी सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांनाही नवनवीन संदेशातून माहिती जाणून घेण्याची ...

बॉलिवूड स्टारर्स ‘ट्विटर’पासून दुरावा
करीना कपूर
करीना कपूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची छायाचित्रे सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय होतात. हजारो चाहते तिच्या छायाचित्रांना लाइक, फारवर्ड करतात. तिला आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावर थेट संवाद साधायला आवडते. यासाठी तिच्या हाताखाली एक चमू करीत असतो. मात्र, आजचा दिवस तिने कसा सुरू केला, आज तिचे काय नियोजन आहे, एखाद्या चित्रपटाबद्दल तिची काय मते आहेत, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुमची निराशा होईल. कारण करीना ट्विटर किंवा असे इतर कोणतेही माध्यम वापरत नाही.
रणबीर कपूर
अभिनेता रणबीर कपूरने काही काळ ट्विटरचा वापर केला होता. आता मात्र तो हे माध्यम वापरत नाही. तो म्हणतो, चाहत्यांना सांगायला माझ्याकडे असे काही विशेष नसतेच. मग कशाला मी सोशल मीडियाचा वापर करू? खरे तर रणबीरचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या नावामुळे किंवा छायाचित्रामुळे लक्ष वेधून घेतले जाते. तो सोशल मीडिया वापरत नसल्याने त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा होते. पुढे मागे त्याचे मन बदलेले आणि तो ट्विटरसारखे माध्यम वापरू लागेल, अशी अपेक्षा त्याचे चाहते करतात.
कंगना राणावत
कंगना राणावतसुद्धा ट्विटरचा वापर करीत नाही. ती टिष्ट्वटर वापरत असती तर काही आठवड्यांपूर्वी हृतिक रोशनच्या कॉमेंटवर तिने काय प्रतिक्रिया दिली असती? या जुन्या मित्रांमध्ये ट्विटरवर कसे युद्ध झाले असते, याची कल्पना नाही करवत. कंगना ही धाडस आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ट्विटरवर तिच्या प्रतिक्रिया अतिशय रंगक असत्या. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, असे वाटणाºयांपैैकीच कंगना ही एक आहे.
काजोल
काजोल ही ट्विटरचा वापर करीत नव्हती. संयुक्त राष्टÑसंघाशी जुळल्यानंतर तिला ट्विटर वापरणे जणू बंधनकारक झाले. चित्रपटांशी संबंधित काही सांगायचे असले तर ती किंवा तिच्या मार्फत कुणी तरी काही नवीन संदेश प्रसारित करीत असतो. मागील वर्षी ‘दिलवाले’च्या प्रमोशनच्या वेळेस काजोलने एक विनोद सांगितला होता. तिने शाहरूखला तिच्या वतीने ट्विट करायला सांगितले होते.
इमरान खान
इमरान खानला सोशल मीडियाचा वापर करायला आवडत नाही.
खरे तर ट्विटरचा वापर करणाºया मोजक्या काही सेलिब्रेटींपैैकी तो एक होता. आधी तो त्याच्या दैैनंदिन घडामोडी, चित्रपांविषयी, प्रवासाविषयी ट्विटरवर माहिती द्यायचा. त्याचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप झाल्यानंतर त्याने ट्विटरचा नाद सोडला. सध्या तरी तो ट्विटरवर येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
सैफ अली खान
अभिनेता सैफ अली खान हा सुद्धा याच मालकेतला आहे.इतर सर्व खान अभिनेते ट्विटर वापरत असताना सैफला मात्र ट्विटरचे आकर्षण नाही. त्याला ते आवडत नाही म्हणून, की चाहत्यांचा त्रास नको म्हणून त्याने असा निर्णय घेतला का, कुणास ठाऊक. मला काही सांगायचेच नाही, तर कशाला ट्विटर वापरू? असा त्याचा प्रश्न आहे.
कॅटरिना कैैफ
कॅटरिना कैैफ ज्या प्रकारे मुलाखती देते, ते पाहता तिने ट्विटरवर काय संदेश दिले असते, आणि किती बोअर केले असते, याची कल्पनाही करवत नाही. कदाचित तिला याची कल्पना असावी म्हणूनच तिने हे माध्यम स्वीकारले नसावे.एकदा मात्र तिने ट्विट केले होते. केन्समध्ये एका उत्पादनासाठी ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून काम करताना तिने एक ट्विट केले होते. खरे तर ती वय्ौक्तिकरित्या हे अकाउंट वापरत नव्हती. तिच्यासाठी स्वीय सहायक हे काम करीत होते. तिला तिच्या वय्ौक्तिक आयुष्याविषयी कुणी फार काही विचारलेले आवडत नाही. हा त्रास टाळण्यासाठी ती ट्विटर वापरत नसावी.
राणी मुखर्जी
ट्विटर न वापरणाºयांच्या मालिकेतील आणखी एक नाव म्हणजे राणी मुखर्जी. खरे तर तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तिच्या विषयी एखादे ट्विटर केले की साºया जगातून प्रतिक्रिया उमटतात. एवढी तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे. पण तिला याचे काही देणे घेणे नाही. तशीही मुलीच्या जन्मामुळे ती अधिकच व्यस्त झाली असेल. अशा गोष्टींना वेळ देऊ शकत नसेल. अजूनहतरी ट्विटर वापरण्याचा तिचा मूड दिसत नाही.
(source : scoopwhoop.com)
.