Don 3 Update: ना रणवीर, ना शाहरुख! आता 'डॉन ३' मध्ये 'हा' अभिनेता बनणार डॉन? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:33 IST2026-02-16T16:27:00+5:302026-02-16T16:33:06+5:30

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'डॉन' (Don) चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच 'डॉन ३'ची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. शाहरुख खाननंतर या भूमिकेसाठी रणवीर सिंगची निवड करण्यात आली होती. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत अत्यंत आश्चर्यजनक माहिती समोर येत आहे.

Don 3 Update now farhan akhtar will be played the title role of don | Don 3 Update: ना रणवीर, ना शाहरुख! आता 'डॉन ३' मध्ये 'हा' अभिनेता बनणार डॉन? मोठी अपडेट समोर

Don 3 Update: ना रणवीर, ना शाहरुख! आता 'डॉन ३' मध्ये 'हा' अभिनेता बनणार डॉन? मोठी अपडेट समोर

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'डॉन' (Don) चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच 'डॉन ३'ची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. शाहरुख खाननंतर या भूमिकेसाठी रणवीर सिंगची निवड करण्यात आली होती. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत अत्यंत आश्चर्यजनक माहिती समोर येत आहे. रणवीर सिंगने या प्रोजेक्टमधून माघार घेतली असून, आता खुद्द दिग्दर्शक फरहान अख्तरच 'डॉन'च्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

फरहान अख्तर स्वतः 'डॉन' बनणार?

रणवीरच्या एक्झिटच्या चर्चेनंतर आता अशा बातम्या येत आहेत की, फरहान अख्तर स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकतो. सध्या तरी या बातम्यांची अधिकृत पुष्टी कोणीच केली नाहीये. फरहानही  'डॉन ३' बद्दल स्वतः काहीच बोलत नाहीये. त्यामुळे फरहान 'डॉन ३' मध्ये स्वतःच डॉन होणार की नाही, या सुद्धा निव्वळ चर्चाच आहेत, हे अद्याप कळू शकलं नाहीये. सध्या तरी फरहान केवळ दिग्दर्शक म्हणून या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे.

रणवीर सिंगने चित्रपट सोडला?

अमर उजालाच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की रणवीर सिंगने काही कारणास्तव या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रणवीरनंतर या भूमिकेसाठी हृतिक रोशनचे नाव समोर आले होते, पण हृतिकने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की तो या चित्रपटाचा भाग नाही. या सर्व गोंधळात शाहरुख खानचे चाहते मात्र आशावादी आहेत.

अशीही चर्चा होती की शाहरुख खान पुन्हा एकदा डॉनच्या भूमिकेत परतण्यास तयार झाला होता, पण त्याची अट अशी होती की या चित्रपटाचे दिग्दर्शन एटली (Atlee) यांनी करावे. मात्र, 'डॉन' ही फरहान अख्तरची स्वतःची फ्रँचायझी असल्याने तो दिग्दर्शकाची खुर्ची सोडण्यास तयार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

फरहान अख्तर सध्या त्याच्या इतर कामांमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून 'जी ले जरा' या चित्रपटावरही त्याचे काम सुरू आहे. 'डॉन ३' बाबत अद्याप निर्मात्यांकडून किंवा फरहानकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. सध्या या चित्रपटाच्या कास्टिंगवरून प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून डॉन ३ ची भूमिका नेमकी साकारणार कोण, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title : डॉन 3: न रणवीर, न शाहरुख! क्या फरहान अख्तर बनेंगे डॉन?

Web Summary : रणवीर सिंह के 'डॉन 3' से बाहर होने के बाद, अफवाह है कि फरहान अख्तर डॉन का किरदार निभा सकते हैं. शाहरुख एटली को निर्देशक बनाना चाहते थे.

Web Title : Don 3: No Ranveer, No SRK! Farhan Akhtar to be Don?

Web Summary : Amid casting chaos, Ranveer Singh exited 'Don 3'. Rumors suggest director Farhan Akhtar might play Don. Shah Rukh wanted Atlee to direct.