​‘हॉलीवुडमध्ये काम करायचं ? मग एजंट हवा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 22:19 IST2016-05-10T16:49:07+5:302016-05-10T22:19:07+5:30

‘हॉलीवुडमध्ये काम करायचं ? मग एजंट हवा..’ हे वाचून थोडं नवल वाटलं असेल. मात्र हे आम्ही नाही तर बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन ...

'Doing work in Hollywood? Then the agent air ' | ​‘हॉलीवुडमध्ये काम करायचं ? मग एजंट हवा’

​‘हॉलीवुडमध्ये काम करायचं ? मग एजंट हवा’

ॉलीवुडमध्ये काम करायचं ? मग एजंट हवा..’ हे वाचून थोडं नवल वाटलं असेल. मात्र हे आम्ही नाही तर बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतोय.

नवाजुद्दीनचा रामन राघव 2.0 हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. यावेळी त्याला हॉलीवुडमध्ये काम करणार का असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी बॉलीवुडचे कलाकार हॉलीवुडच्या सिनेमात काम करतात ते त्यांच्यातील अभिनय कौशल्यामुळं नव्हे तर त्यांचे एजंट त्यांना हे सिनेमा मिळवून देतात असं रोखठोक मत नवाजुद्दीननं व्यक्त केलं.

जे बॉलीवुड स्टार सध्या हॉलीवुडमध्ये काम करतायत त्यांच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून चांगले एजंट आहे.. माझ्याकडे आजवर कोणताही एजंट नाही. त्यामुळं हॉलीवुडमध्ये काम करण्याचा प्रश्नच नाही असंही नवाजनं म्हटलंय.

हॉलीवुडमध्ये काम करण्याला अतिमहत्त्व दिलं जात असल्याचंही त्यानं नमूद केलं. याआधीच्या काळात अमरीश पुरी, ओम पुरी, गुलशन ग्रोव्हर यांनीही हॉलीवुडमध्ये काम केलंय. त्यांची चर्चा का नाही झाली, आताच का ती होते असा सवालही त्यानं उपस्थित केला आहे.

Web Title: 'Doing work in Hollywood? Then the agent air '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.