रणवीर सिंहचा हा जॉली लूक तुम्ही पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 13:07 IST2017-04-08T07:37:48+5:302017-04-08T13:07:48+5:30
बॉलिवूडचा मोस्ट इलिजिबल बॅचलर, चार्मिंग हिरो अशा अनेक नावांनी फेमस असणारा रणवीर सिंहची जादू आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...

रणवीर सिंहचा हा जॉली लूक तुम्ही पाहिलाय का?
ब लिवूडचा मोस्ट इलिजिबल बॅचलर, चार्मिंग हिरो अशा अनेक नावांनी फेमस असणारा रणवीर सिंहची जादू आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा सिनेमा असो किंवा दिपिकासह रंगणा-या त्याच्या अफेअर्सच्या चर्चा किंवा मग त्याच्या लूकमुळे तो सतत चर्चेत असतो. नुकताच मुंबई एअपोर्टवर रणवीर सिंह एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळाला. यावेळी अगदी जॉली लुकमध्ये दिसणारा रणवीरचा हा अंदाजाने सा-यांचेच लक्ष वेधले होते.यावेळी लुकप्रमाणेच तो फनी मुडमध्येही होता.त्याला बघताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासह फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती.कोणालाही न दुखवता चाहत्यांसह सेल्फीही क्लिक करताना दिसला. त्याच्या या नवीन लूकमुळे पद्मावतीनंतर रणवीर कोणत्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे याची चर्चा सुरू झाली आहे.यावेळी त्याचा लुकने याविषयी रणवीरने बोलणे टाळले असले तरीही ''ये तो बस ट्रेलर है पिक्चर तो अभी बाकी है'' असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण जेव्हा जेव्हा रणवीरचा लूक चेंज होतो. त्यावेळी त्याच्या आगामी सिनेमाचा संकेत मिळत असतात. यापूर्वीही त्याच्या सिनेमासाठी त्याला सिनेमाच्या भूमिकेतील लूक प्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट केले गेले होते.त्यानंतर ऑनस्क्रीनही त्याचे ते लुक सिनेमात पाहायला मिळाले होते. संजय लीला भन्साळीच्या आगामी पद्मावती सिनेमासाठी रणवीरने दाढी असलेला लूक ठेवला होता. याआधी भन्साली यांच्या 'रामलीला' सिनेमामध्ये रणवीरनं आपले केस वाढवले होते.तर 'बाजीराव मस्तानी' सिनेमात त्याचा बाल्ड लूक सा-यांनी पाहिलाय.त्यामुळे आता त्याचा हा जॉली लूक काय जादू दाखवणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
![]()