​मलायका अन् अमृता या दोघी अरोरा बहिणींचे हॉट फोटोशूट तुम्ही बघितले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 13:59 IST2017-04-05T08:11:48+5:302017-04-05T13:59:06+5:30

लहानपणी माझी बहीण माझ्यापेक्षा गोरीगोमटी होती. त्यामुळे अनेकदा आजुबाजूचे लोक मला तिच्या तुलनेत कमी लेखायचे. तिच्या रंगरूपावरून मला बरेच ...

Do you see the hot photoshoot of Aurora sisters of Malaya and Amrita? | ​मलायका अन् अमृता या दोघी अरोरा बहिणींचे हॉट फोटोशूट तुम्ही बघितले?

​मलायका अन् अमृता या दोघी अरोरा बहिणींचे हॉट फोटोशूट तुम्ही बघितले?

ानपणी माझी बहीण माझ्यापेक्षा गोरीगोमटी होती. त्यामुळे अनेकदा आजुबाजूचे लोक मला तिच्या तुलनेत कमी लेखायचे. तिच्या रंगरूपावरून मला बरेच काही ऐकावे लागायचे, असे अलीकडे मलायका अरोरा म्हणाली होती. मलायका बोलत होती, ते तिची बहीण अमृता अरोरा हिच्याबद्दल. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. होय, लहानणी मलायका कदाचित अमृता इतकी गोरीगोमटी नसेल. पण आता बघाल तर दोघींमध्ये जराही फरक नाही. हॉटनेसच्या बाबतीत तर दोघीही तोडीस तोड आहेत. विश्वास बसत नाही, तर मग अरोरा बहिणींचे हे हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट फोटोशूट तुम्ही पाहायलाच हवे. होय, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या दोघी बहीणींनी अलीकडे एका मासिकासाठी एकत्र फोटोशूट केले. हे फोटोशूट पाहिल्यानंतर अरोरा बहिणींवरून आपल्या नजरा हटणार नाहीत, हे नक्की. 





आजही मलायका व अमृता एकत्र आल्या की, मीडियाचे कॅमेरे त्यांची एक छबी टीपण्यासाठी आतूर होतात. आता तर त्यांचे एकत्र फोटोशूट तेही बोल्ड फोटोशूट म्हटल्यावर चाहत्यांसाठी ही डबल ट्रिट म्हणावी लागणार आहे. हे फोटोशूट ्त्यामुळेच तुम्ही बघायला हवे आणि त्यातील अरोरा बहिणींच्या अदांवर खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटही लिहायला हव्यात. 





अलीकडे  सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा हिचा मुलगा अहिल याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाले. मालदिवला झालेल्या सेलिब्रेशनमध्ये मलायका व अमृता दोघीही धम्माल मस्ती करताना दिसल्या होत्या.



 मलायका अरोरा खान ही बी टाऊनच्या सर्वांत हॉट अ‍ॅॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. पती अरबाज खानसोबत घटस्फोट मिळवल्यानंतर ती पुन्हा तिचे बॅचलर लाईफ एन्जॉय करतांना अलीकडेच अनेकदा दिसतेय. गर्लगँगसोबत आऊटींग, गर्ल्स नाईट आऊट, पार्टीज, व्हॅकेशन्सवर जातांना दिसतेय.  
 

Web Title: Do you see the hot photoshoot of Aurora sisters of Malaya and Amrita?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.