या नव्या पोस्टरवरची ‘फटाकडी’ स्वरा भास्कर तुम्ही पाहिलीतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 13:56 IST2017-02-20T08:26:02+5:302017-02-20T13:56:02+5:30
स्वरा भास्कर सध्या जोरात आहे. विश्वास बसत नसेल तर ‘अनारकली आॅफ आरा’चे हे नवे पोस्टर पाहा आणि दिग्दर्शक करण ...

या नव्या पोस्टरवरची ‘फटाकडी’ स्वरा भास्कर तुम्ही पाहिलीतं?
स वरा भास्कर सध्या जोरात आहे. विश्वास बसत नसेल तर ‘अनारकली आॅफ आरा’चे हे नवे पोस्टर पाहा आणि दिग्दर्शक करण जोहरची नवी पोस्ट वाचा. होय, करण जोहरने स्वरा भास्करच्या ‘अनारकली आॅफ आरा’चे नवे पोस्टर जारी केले आहे. शिवाय स्वराला मनापासून शाब्बासकीही दिली आहे. ‘Well done @ReallySwara for constantly breaking ground!! 24th march is the date guys ! For this new world and engaging film!!!’,असे tweet करणने केले आहे.
{{{{twitter_post_id####
या नव्या पोस्टरमध्ये स्वरा अगदी ‘फटाकडी’ दिसतेय. अलीकडे एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल स्वरा भरभरून बोलली होती. ‘अनारकली आॅफ आरा’ माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. केवळ हा चित्रपट एका ताज्या व महत्त्वपूर्ण मुद्यावर आहे म्हणून नव्हे तर हा चित्रपट म्हणजे निश्चितपणे एक धाडसी निर्णय आहे. दिग्दर्शक अविनाश दास यांनी मला चित्रपटाची कथा ऐकवताच, मी यातील माझ्या भूमिकेच्या प्रेमात पडले होते, असे स्वरा म्हणाली होती.
‘अनारकली आॅफ आरा’ ही बिहारच्या आरा जिल्ह्यातील द्विअर्थी गाणे गाणारी एक गायिका आहे. अचानक तिच्या आयुष्यात एक वादळ येते आणि ती एका प्रभावशाली व्यक्तिच्या अत्याचाराची शिकार ठरते. पण त्याच्यापुढे गुडघे न टेकवता ती त्याच्याविरूद्ध लढण्याचा निर्णय घेते, अशी या चित्रपटाची कथा आहे.
काही दिवसांपूर्वी स्वराची बेस्ट फे्रन्ड सोनम कपूर हिने ‘अनारकली आॅफ आरा’ चे टिजर जारी केले होते. मी हा चित्रपट पाहिला आहे.(निश्चितपणे, मी हा चित्रपट सर्वात आधीच पाहणार होते) हा चित्रपट पाहून मी कमालीची प्रभावित झालीय. स्वराने यात साकारलेला अभिनय कुठल्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही, असे सोनमने लिहिले होते.
{{{{twitter_post_id####
}}}}Well done @ReallySwara for constantly breaking ground!! 24th march is the date guys ! For this new world and engaging film!!! pic.twitter.com/3zmuUvOIrO— Karan Johar (@karanjohar) 20 February 2017