​तुम्हाला माहिती आहे का ‘31 ऑक्टोबर’मधील सोहाच्या दोन मुलांचे ‘गुपित’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 16:39 IST2016-10-20T15:31:42+5:302016-10-20T16:39:22+5:30

सोहा अली खान आणि वीर दास यांची मुख्य भूमिका असलेला ‘31 ऑक्टोबर’ हा चित्रपट येत्या आठवड्यात रिलीज होतो आहे. ...

Do you know the 'secret' of two Soha boys in '31 October '? | ​तुम्हाला माहिती आहे का ‘31 ऑक्टोबर’मधील सोहाच्या दोन मुलांचे ‘गुपित’?

​तुम्हाला माहिती आहे का ‘31 ऑक्टोबर’मधील सोहाच्या दोन मुलांचे ‘गुपित’?

हा अली खान आणि वीर दास यांची मुख्य भूमिका असलेला ‘31 ऑक्टोबर’ हा चित्रपट येत्या आठवड्यात रिलीज होतो आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना या चित्रपटाबद्दल एक  मनोरंजक बातमी माहिती पडलीय. ८० च्या दशकातील कथा असणाऱ्या या चित्रपटात सोहा दोन मुलांच्या आईची भूमिका साकारणार आहे. सोहाच्या याच दोन मुलांबद्दलच आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. होय, पडद्यावर दिसणारी सोहाची ही दोन मुलं प्रत्यक्षात मुलगे नसून मुली आहेत. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना सोहा व वीरच्या मुलांच्या भूमिकेसाठी दोन बालकलाकार हवे होते. शिख कुटुंबातील मुले म्हणजे या मुलांचे केस लांब हवे होते. पण लाख प्रयत्न करूनही शिवाजी यांना या भूमिकेसाठी लांब केस असलेले दोन बालकलाकार सापडले नाहीत. बालकलाकार अनेक होते, पण त्यांचे केस वाढवण्याइतपत वेळ शिवाजी यांच्याकडे नव्हता. मग काय, या मुलांच्या भूमिकेसाठी लांब केस असलेल्या दोन मुलींची निवड करण्यात आली. याच दोन चिमुकलींनी ‘31 ऑक्टोबर’मध्ये शिख मुलांची भूमिका साकारली.  
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येवर आधारित ‘31 ऑक्टोबर’ या चित्रपटात सोहा एका मध्यमवर्गीय पंजाबी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या भूमिकेत जीव ओतण्यासाठी सोहाने कुठलीच कसर सोडली नाही. अगदी मध्यवर्गीय पंजाबी महिलेची व्यक्तिरेखा अधिक विश्वासार्ह वाटावी यासाठी सोहाने चंदीगडच्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांकडे जाऊन शॉपिंगदेखील केली. चंदीगडच्या सेक्टर १७ व २२ मध्ये सोहाने तिच्या स्टाईलिस्टसोबत जाऊन अनेक लहान मोठ्या वस्तू खरेदी केल्या. त्याच वस्तू तिने चित्रपटात वापरल्या आहेत.
 

Web Title: Do you know the 'secret' of two Soha boys in '31 October '?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.