तैमुरला सांभाळणाऱ्या केअरटेकरला किती पगार मिळतो माहितीये का? किंमत ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 11:42 IST2022-01-24T11:41:32+5:302022-01-24T11:42:46+5:30

Taimur: सैफ किंवा करीना कुठेही गेले तरीदेखील ते तैमुर आणि जहांगीरला त्यांच्यासोबत घेऊन जातात. परंतु, यावेळी दोन्ही मुलांसोबत त्यांच्या केअरटेकरची टीम असते.

do you know saif ali khan and kareena kapoor son taimur nanny salary | तैमुरला सांभाळणाऱ्या केअरटेकरला किती पगार मिळतो माहितीये का? किंमत ऐकून बसेल धक्का

तैमुरला सांभाळणाऱ्या केअरटेकरला किती पगार मिळतो माहितीये का? किंमत ऐकून बसेल धक्का

सध्याच्या काळात कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगत असते. यात सैफ अली खान (saif ali khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor khan) यांचा लेक तैमुर कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. विशेष म्हणजे जन्मापासून स्टारडम उपभोगणारा तैमुर (Taimur) आज लोकप्रिय स्टारकिडमध्ये अग्रस्थानावर आहे. त्यामुळे तो कुठेही दिसला तरीदेखील चाहते त्याची एक छबी कॅमेरात कैद करण्यासाठी पुढे सरसावतात. मात्र, या सगळ्यांपासून त्याला दूर ठेवणं, त्याची काळजी घेणं या सगळ्यासाठी सैफ- करीनाने त्याच्यासाठी एक केअरटेकर ठेवला आहे. विशेष म्हणजे या केअरटेकरला केवळ तैमुरला दिवसभर सांभाळण्यासाठी लाखो रुपयांचा पगार दिला जातो. म्हणूनच, तैमुरच्या केअरटेकरला किती पगार मिळतो ते पाहुयात.

अनेकदा सैफ किंवा करीना कुठेही गेले तरीदेखील ते तैमुर आणि जहांगीरला त्यांच्यासोबत घेऊन जातात. परंतु, यावेळी दोन्ही मुलांसोबत त्यांच्या केअरटेकरची टीम असते. या केअरटेकर दिवसभर सैफ-करीनाच्या बाळाला सांभाळण्यासाठी मोठी रक्कम आकारतात.
तैमुरचा जन्म झाल्यापासून एक नॅनी कायम त्याच्या सोबत असते. विशेष म्हणजे या नॅनीला महिन्याला तब्बल १ लाख ५० हजार रुपये पगार देण्यात येतो. इतकंच नाही तर, तिने ओव्हर टाइम केल्यास तिला २५ हजार रुपये एक्स्ट्रा देण्यात येतात.

दरम्यान, तैमुरच्या नॅनीला इतकी मोठी रक्कम पगार म्हणून दिल्यानंतरही तिला अन्य सोईसुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. तैमुरच्या नॅनीला एक स्वतंत्र कार देण्यात आली आहे. या कारमधून अनेकदा ती तैमुरला फिरायला घेऊन जात असते. 
 

Web Title: do you know saif ali khan and kareena kapoor son taimur nanny salary